वायदे बंदी (सेबी) विरोधात आवाज उठवणारे जळगाव जिल्ह्यातील पहिले शेतकरी संतोष पाटील.

बळीराजा जिंकला कापसाचे वायदे १० दिवसांत होणार सुरू

कापसाच्या वायद्यांवर घालण्यात आलेली बंदी हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ‘सेबी’ (सेक्युरिटीज् अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया) अंतर्गत कार्यरत ‘पीएसी’च्या (प्रॉडक्ट अॅडव्हायझरी (कमिटी) बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कापसाचे वायदे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कापसावरील वायदे बंदी हटविण्यासाठी शेतकरी संघटनेने मुंबई स्थित ‘सेबी’च्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. शिवाय, शेतकऱ्यांची बाजू घेत वृत्तांकन केले होते. परिणामी, सोमवारी (दि. २३) पार पडलेल्या ‘पीएसी’च्या बैठकीत कुठलाही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे अॅग्रोस्टारचे दिलीप ठाकरे यांनी ‘पीएसी’ची पुन्हा बैठक घेऊन घेण्यात आला. याबाबत निर्णय घेण्यासाठी पुढाकार घेतल्याने सोमवारी दिनांक ३० जानेवारी रोजी पीएसी’ची बैठक पार पडली. या बैठकीत दिलीप ठाकरे आणि कॉटनगुरू मनीष डागा यांनी कापसावरील वायदे बंदी हटविण्याचा मांडत चर्चेला सुरुवात केली. तेव्हा दक्षिण भारतातील टेक्सटाईल व गारमेंट लॉबीच्या सदस्यांनी विरोध दर्शविताच पीएसी चे अध्यक्ष पी. राजकुमार, सुरेश कोटक, जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष बी. एस. राजपाल यांनी वायदे बंदी
हटविण्याच्या समर्थनात भूमिका मांडली. देशातील जिनिंग प्रेसिंग आणि सूत गिरणी संघटनांच्या प्रतिनिधींनी या मागणीला समर्थन दिले होते. त्यामुळे या बैठकीत वायदे बंदी हटविण्याचा निर्णय घेत
कापसावरील वायदे बंदी हटविण्याबाबतचे सर्क्युलर बुधवारी १ फेब्रुवारी रोजी कंपनीच्या वेबसाईटवर जारी केले ‘सेबी’च्या नियमानुसार अंतर्गत तांत्रिक कामे करण्यासाठी किमान १० दिवस लागतात. त्यामुळे १० दिवसांनी एप्रिल आणि जून या दोन महिन्यांचे वायदे सुरू होणार असल्याचेही ‘एम. सी‌ एक्स’ च्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेकिंग बातम्या