गरुड महाविद्यालयात अर्थ व वाणिज्य अभ्यास मंडळाचे उदघाटन संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०९/२०२२
जामनेर तालुक्यातील आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड महाविद्यालयाच्या अर्थ व वाणिज्य मंडळाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मा. श्री. वासुदेव आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. सबत दिघल, भुवनेश्वर ओरिसा यांच्या शुभहस्ते हस्ते आज रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मा. श्री. वासुदेव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत प्रत्येकाने आपल्या करिअरच्या संदर्भात सजग राहून योग्य वेळी योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सबत दिघल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी सातत्याने काळानुसार अपडेट राहण्याची गरज असल्याचे त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य, सामाजिक कौशल्य अशी विविध कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुजाता पाटील यांनी केले त्यांनी प्रास्ताविकातून अर्थ व वाणिज्य मंडळाची भूमिका मांडली. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे, उपप्राचार्य डॉ. संजय भोळे प्रा. अमर जावळे अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. प्रशांत देशमुख इतिहास विभाग प्रमुख, डॉ. दिनेश पाटील आयक्यूएसी समन्वयक, डॉ. वसंत पतंगे, डॉ.योगिता चौधरी, डॉ.रोहिदास गवारे, डॉ. आजिनाथ जिवरग या मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतिथींचा परिचय कु. शिवानी पालीवाल या विद्यार्थिनींनी केला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रंजना कुमावत व कु. प्रांजल चौधरी यांनी तर आभार कु. प्राजक्ता सरोदे या विद्यार्थिनीने मानले.