अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अधिवेशन ठाण्यात,राज्यपाल कोश्यारींची विशेष उपस्थिती.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~३१/०७/२०२२
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन यावेळी येत्या आगष्ट महिन्यात ठाणे येथे आयोजित करण्यात आले असून या अधिवेशनात महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस सह राजकिय,पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनात कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते विविध सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसाठी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यात ज्या पत्रकारांनी आपल्या लेखणीतून समाजातील शेवटच्या निराधार व्यक्तींना न्याय मिळवुन देणे,शोध पत्रकारीता,शासनाच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिध्दी देऊन समाजाला सुविधा उपलब्ध करुन देण्यात सक्रिय सहकार्य केले अशा पत्रकारांना पत्रकार भुषण, उद्योगात ज्यांनी आपला ठसा उमटवला त्यांना उद्योग रत्न, कृषी क्षेत्रातील प्रगत शेतकर्याला कृषिरत्न,शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्यकरणार्या शिक्षकाला शिक्षक रत्न,सामाजिक क्षेत्रात अपली छाप पाडणार्यांना समाजभूषण,सांसदिय क्षेत्रात उत्कृष्ट सामाजिक प्रश्नांची सोडवणुक करणार्या राजकारणातील सक्रिय लोकप्रतिनिधीला संसद रत्न आदी पुरस्कार देऊन महामहिम राज्यपालांचे हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील इच्छुकांनी आपल्या क्षेत्रातील केलेल्या कार्याची लिखित माहीती आवश्यक कागदपत्रासह दिनांक ३० जुलै पर्यंत नमुद वाटसअँप नंबर किंवा नमुद पत्त्यावर फोटोसह पाठवावी. दिनांक एक ऑगस्ट रोजी निवड समितीने निवड केल्यानंतर दोन दिवसाच्या आत आपल्याला पत्र पाठवल्या जाईल अधिक माहितीसाठी ९०८२०२९६६, ९४२१५३६७५५, ७३०४२५७३७७, ८३५१९००५९५, ८६५५५२०८१९, ९१५२०२७७०८ तथा आनंद हिला तळमजला दगडी शाळेसमोर ठाणे पश्चिम 400602 येथे संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे अधिवेशनाचे आयोजक पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी यांनी केले आहे.