विधानपरिषदसाठी राष्ट्रवादी कोट्यातून एकनाथ खडसेंची लॉटरी लागण्याचे संकेत
दिलीप जैन. ( पाचोरा )
देर आये दुरुस्त आये असे म्हणने एकनाथराव खडसेंच्या बाबतीत वावगे ठरणार नाही
कारण एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत गेल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घडामोडी होत आहेत व बरेचसे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते खडेसेंच्या संपर्कात आहेत व याचा राष्ट्रवादीला फायदा होईल
म्हणून विधानपरिषद करिता राज्यपाल निर्देशित आमदार नियुक्ती करिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचं नाव जवळपास निश्चित झालं असल्याची जोरदार चर्चा आहे.
विधानपरिषद करिता राज्यपाल निर्देशित आमदारांच्या नियुक्त्यांना गेल्या काही दिवसांपासून रखडला होता. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तिघंही पक्षांकडून बारा जणांची यादी तयार असल्याची माहिती आहे. उद्या मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर ही यादी राज्यपाल यांच्याकडे पाठवली जाणार असल्याचे समजते.
भाजपाला राम राम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जेष्ठत्वाचा व अनुभवाचा मान राखला जाईल असं राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून सांगण्यात येत असल्याने खडसे यांना ‘सभागृहात’ आणण्यासाठी राष्ट्रवादी खडसेंच्या नावावर शिक्का मोर्तब करेल असं वाटत आहे.