बोलठाण ग्राम पंचायत विश्वासात घेत नाही, सुनिता बनकरांचा आरोप.
मुक्ताराम बागुल.(बोलठाण) ता.नांदगाव
दिनांक~०७/११/२०२१
नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील ग्राम पंचायतीत एकुण १३ सदस्य असुन या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक मला विश्वासात न घेता कामकाज करत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्या सौ.सुनिताताई बनकर यांनी केला असून सरपंच व ग्रामसेवकाच्या मनमानी कारभाराबाबत नांदगाव तहसीलदार यांच्याकडे दिनांक ११ ऑक्टोबर सोमवार रोजी तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत बोलठाण येथील बसस्थानक कोणतेही कारण नसतांना जमीनदोस्त केले आहे. या मागील कारण म्हणजे या ठिकाणी व्यापरी वर्गासाठी गाळ्यांचे बांधकाम करुन यातून ते आपला स्वार्थ हेतू साधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला असून बसस्थानक पाडल्यामुळे आज प्रवाशांना निवारा नसल्याने व महिला, पुरुषांसाठी येथे मुतारी व शौचालय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून विशेष करुन महिला व विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले.
तसेच बसस्थानकाचे जागेवर पुन्हा बसस्थानक बांधून बसस्थानकाचे दोन्ही बाजूंनी महिला व पुरुषासाठी शौचालय व मुतारी बांधण्यात यावी तसेच ग्रामपंचायतीचा गट नंबर ३५८ मध्ये सर्व समाजाच्या स्मशान भुमिची नोंद व इतर हक्क नोंदणी करावी इतर अधिकार नोंदी करणेबाबत वारंवार अर्ज करुन देखील ग्रामस्थांच्या व मझ्या अर्जाचा विचार केलेला नाही. अनुसूचित जाती,जमाती,लिंगायत,वडार समाजासाठी स्मशानभूमीतची इतर अधिकारात नोंद करुन अतिक्रमण जागा मोजणी करणे व यास प्रशासकीय मंजूरी मिळवून देत नाहीत.
अशी तक्रार केली असून उपोषणाला बसणार असल्याचे सौ.सुनिताताई बनकर यांनी नमूद केले आहे.
तर दुसरीकडे ग्रामसेवक मा.श्री. भगवान जाधव यांनी सौ.सुनिताताई बनकर यांचे आरोपाचे खोटे असल्याचे सांगत बसस्थानकाचे जागेवर चांगल्यापैकी बसस्थानकच बांधण्यात येणार असून महिला व पुरुषांसाठी मुतारी व शौचालय हे सुधारित पध्दतीने बांधण्यात येणार असल्याचे सांगत पुढील कामासाठी रीतसर परवानगी व इतर त्रुटी दुर करण्यासाठी आम्ही मा. तहसीलदार व संबधीतांकडे पत्रव्यवहार केला असून परवानगी मिळताच कामाला सुरुवात होईल असे सांगितले.