होतकरू विद्यार्थ्यांसाठी नमन फाउंडेशन तर्फे फत्तेपूर येथे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/११/२०२२
सद्यस्थितीत आजचा तरुण शिक्षण घेतल्यानंतर भविष्याचा विचार करून नोकरी करायची की व्यवसाय करायचा या शोधात फिरत असतो बरेचसे तरुण दहावी, बारावीनंतर कोणत शिक्षण घ्यावं, कोणता डिप्लोमा किंवा कोणता कोर्स करावा आर्ट, कॉमर्स, सायन्स घ्यावे किंवा दुसरा एखादा आय. टी. आय. किंवा तत्सम शिक्षण घेण्यासाठी विचार करत असतो. कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन गुणवत्तेचे दाखले घेऊन तो नोकरीच्या शोधात फिरत असतांना योग्य मार्गदर्शन किंवा अनुभव नसल्याने तो हतबल होतो म्हणून याच समस्यांवर योग्य मार्गदर्शन करण्यासाठी फत्तेपूर परिसरातील होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी फत्तेपूर येथील नमन फाउंडेश यांच्यातर्फे दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ बुधवार रोजी फत्तेपूर येथील बाजार समिती गुरांचा बाजाराचे आवारात मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन केले आहे. तरी जास्तीत, जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पोलीस भरती मार्गदर्शन शिबिरात एम.पी.एस.सी, यु.पी.एस.सी. यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. तरी सर्व होतकरू विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनपर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक वाय. सी. चौधरी सर फत्तेपूर, स्पर्धा परिक्षेची तयारी कशी करावी या विषयावर विशेष मार्गदर्शक म्हणून विकास गिरासे सर (द युनिक अकॅडमी जळगाव), पोलीस भरतीची तयारी कशी करावी याबाबत स्वप्निल हिवराळे सर (द प्राईम अकॅडमी जळगाव संचालक) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच भव्य पुस्तक विक्री प्रदर्शन ४०% सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत यानिमित्ताने अंबे वडगाव येथील, मा. श्री. संतोषदादा पाटील. (कवी) सामाजिक कार्यकर्ते, कुंभारी सिम येथील मा. श्री. आबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमची सुरवात सकाळी साडे अकरा वाजता होणार असल्याने सगळ्यांनी वेळेवर हजर राहून या शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती.
आयोजक -राहुलरोइ मुळे ,नमन फाउंडेशन संचालक ,
दशरथ पाटील (नमन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष )
मयूर पाटील ,नमन फाउंडेशन उपाध्यक्ष
भूषण कानडजे ,तोडापुर ,नमन फाउंडेशन सहसचिव ,
रवींद्र राठोड (पोलीस पाटील पठाड तांडा,
,फिनिक्स अकॅडमी फत्तेपुर
समस्त नमन फाउंडेशन जामनेर.