वाढदिवसा निमित्ताने मोफत रक्तगट व सी.बी.सी.तपासणी शिबीर संपन्न.
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/१२/२०२०
पाचोरा शहरातील नुरानी नगर जारगाव चौफुली येथील रहिवासी तौफिक शेख यांच्या वाढदिवसानिमित्त व डॉ. फिरोज शेख (सेवा लॅब)देशमुख वाडी पाचोरा यांच्या सौजन्याने दिनांक ६डिसेंबर रविवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून तर दुपारी २वाजेपर्यंत मोफत रक्तगट व सी.बी.सी.तपासणी शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे सुरवातीला तौफिक शेख यांना उपस्थितांनी पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच डॉक्टर फिरोज शेख व नगरसेवक लतिफ खान यांचा सत्कार करण्यात आला.
नंतर रक्तगट तपासणी शिबीरास सुरुवात करण्यात आली.
या शिबिराचा १५० लोकांनी लाभ घेतला.
या शिबिराचे यशस्वीतेसाठी गुलाफाम शेख , रीजवान देशमुख, सुल्तान अली, गणेश पवार, गौतम गायकवाड, अरबाज काकर, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले
Download WordPress Themes Nulled and plugins.