केशरी टुर्सने यात्रेकरीता घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याचे ग्राहक न्यायालयाचा आदेश.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०३/२०२२
पाचोरा येथील रहिवाशी सौ. शितल संदीप महाजन यांनी केसरी टुर्स च्या जळगांव येथील एजंन्ट मार्फेत दिनांक २०/०१/२०२० रोजी स्वतः सह आपली आई व दोघं मुली अशा चार जणांची ०५/०५/२०२० ते १७/०५/२०२० या कालावधीकरीता यात्रा जाणेसाठी बुंकीग केली होती. या १२ दिवसा कंरीताच्या यात्रेसाठी चारही जणांची एकुण रक्कम रू. १,९७,४००/- मात्र अक्षरी एक लाख सत्त्यांनउ हजार चारशे मात्र केशरी टुर्सच्या जळगांव येथील एजंन्ट यांचेकडे दिनांक २०/०१/२०२० रोजी रोख रक्कम देवुन तशी पावती देखील घेतली होती.
किंबहुना यात्रेला जाणेसाठी संपुर्ण तयारी देखील करून ठेवली होती. मात्र बुकींग केल्यांनतर दोन महीन्यांनी म्हणजेच दिनांक २०/०३/२०२० पासुन संपूर्ण भारतात कोवीड -१९ हया विषाणुच्या संसर्गजन्य आजारामुळे संपुर्ण जगात लॉकडाउन घोषीत करण्यात आले होते व त्यांनुसार केशरी टुर्स यांनी तक्रारदार शितल महाजन हीस सदरहु चारधाम यात्रा स्थगित ठेवल्याबाबत देखील कळविण्यात आलेले होते.
संपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तक्रारदार शितल महाजन यांना चारधाम यात्रेस जाता येणे शक्य नव्हते. तक्रारदार महीला हिने बुकींग केल्यांनतर जवळपास १ ते दीड वर्षे झाल्यांनतर देखील कोरोना महामारीमुळे संपुर्ण निर्बंध असल्याने चारधामा यात्रा जाणे शक्यच नसल्याने तक्रारदार हीने स्वतः व तक्कारदाराचे पती संदीप दा. महाजन यांनी केसरी टुर्स ग्रुपकडे वेळो-वेळी पत्रव्यवहार फोनव्दारे, मेलव्दारे व प्रत्यक्ष भेटुन चारधाम यात्रेची बुकींग रक्कम रू.१,९७,४००/- मात्रची रक्कम परत करण्याबाबत विनंती केली होती.
परंतु केशरी टुर्स सदरहु बुकींची रक्कम परत करता येणार नाही असे सांगीतले तक्रारदार यांस आपली बुकींगची रक्कम परत मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचे पती संदीप महाजन यांनी जळगांव येथील विधी तज्ञ अँड. अशोक. जे. महाजन यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक ८३८००८३२८३/९८५०९०२११२ यावर संपर्क साधुन त्यांच्या ८ जे.टी. चेंबर कार्यालयात सदर प्रकरणी भेटी वेळ घेतली आणि अँड. महाजन यांच्याशी केलेल्या चर्चाअंती जळगांव येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाद मागितली असता मे. आयोगाने सदरहु तक्रारदार सौ. शितल संदीप महाजन यांचा तक्रार अर्ज खर्चासह मंजुर केरून मे. ग्राहक न्यायालयाने सौ. शितल महाजन यांच्या बाजूने दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेल्या निकालात स्पष्ट केले आहे की दि.केशरी टुर्स व जळगांव येथील कार्यालय यांना तक्रारदार यांनी दाखल तारखेपासुन ते संपुर्ण रक्कम अदा होईपावेतो रक्कम रू. १,९७,४००/- मात्र त्यावर ९ टक्के व्याजासह अदा करण्यात यावेत तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, शारीरीक व आर्थीक त्रासापोटी रक्कम रू. ७,०००/- मात्र व तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रू. ३,०००/- मात्र आदेशाची प्रत मिळाल्यापासुन ३० दिवसाचे आत करण्याबाबत आदेशीत केलेले आहे.