सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • अनफिट, नादुरुस्त स्कूलबसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रादेशिक महामंडळाकडून कारवाई अपेक्षित.

  • कायद्याची राहिली नाही भीती, गोळीबार करणाऱ्या आरोपींची जामनेर पोलीसांकडे शरणागती.

  • पाचोरा बसस्थानक गोळीबारातील जखमी आकाश मोरेचा जागीच मृत्यू.

  • पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार, एक गंभीर जखमी.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूलबस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

Uncategorized
Home›कृषी विषयक›Uncategorized›२१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिनानिमित्त खास लेख

२१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिनानिमित्त खास लेख

By Satyajeet News
October 22, 2020
328
0
Share:
Post Views: 90
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

[२१:५९, २२/१०/२०२०] दिलीप जैन.: विर जवानांचा कधीच मृत्यू होत नसतो, तर ते आपल्या मायभूमीच्या कुशीमध्ये चिरनिद्रा घेत असतात, म्हणूनच त्यांच्या मरणाचे ‘मातम’ (दुःख)नाही; तर त्यांचे स्मरण उत्सव सोहळे साजरे केले जातात. – ‘मृत्यूकार’ विनोद अहिरे

( २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन विशेष )

आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आतापर्यंत हजारो पोलिसांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्याच शहिदांना नमन करण्यासाठी २१ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतभरा मध्ये ‘पोलीस हुतात्मा’ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मी ‘साजरा’ यासाठी म्हणत आहे की, आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ जो आपल्या प्राणांची आहुती देतो, त्यांचा कधीच ‘मृत्यू’ होत नसतो तर ते आपल्या मायभूमीच्या कुशीमध्ये चीरनिद्रा घेत असतात, म्हणूनच तर त्यांच्या मरणाचे ‘मातम’ (दुःख) न मनवता त्या शहिदांचे ‘स्मरण उत्सव सोहळे’ साजरे करण्यात येतात. आपल्या मातृभूमीच्या रक्षणार्थ शहीद जवानाच्या सांडलेल्या रक्ताच्या थेंबाथेंबातून असंख्य शस्त्र उगवत असतात आणि पुन्हा सज्ज होऊन असंख्य भुजांमध्ये स्वाभिमानाचे स्फुल्लिंग पेटवित असतात.
म्हणूनच एका शायरने असे म्हटले आहे की,

शहीदों की चिताओं पर लगेंगे हर बरस मेले…
वतन पर मर मिटनेवालो तुम्हारा यही निशा होगा …

२१ ऑक्टोबर १९५९ रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलातील पोलीस सब-इन्स्पेक्टर किरणसिंग यांच्या नेतृत्वात लडाख हद्दीत बर्फाच्छादित १६ हजार फूट उंचीवर असलेल्या हॉटस्प्रिंग या अत्यंत निर्जन स्थळी रक्त गोठवणाऱ्या थंडीत आपले जवान गस्त घालीत असताना, अचानक चिनी सैनिकांनी भ्याड हल्ला केला त्यात भारत मातेच्या १० जवानांना वीरमरण आले. आपले कर्तव्य बजावत असताना जवानांनी अतिशय शौर्याने शत्रू विरोधात लढा देऊन शेवटी मृत्यूला अलिंगन दिले, या जवानांच्या हुतात्म्यांचे स्मरण म्हणून आजही दरवर्षी २१ ऑक्टोबरला देशभरातून प्रत्येक प्रांताचे प्रतिनिधित्व करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जाते.

यामध्ये देशातील आंतरिक सुरक्षा करीत असताना आतंकी हल्ल्यात, नक्षलवादी कारवाई करीत असताना तसेच समाजकंटकांकडून हिंसक कृत्य रोखताना आपल्या मायभूमिसाठी वर्षभरामध्ये जे पोलीस जवान जवान शहीद होतात त्यांची 21 ऑक्टोबर या दिवशी जिल्ह्यातील पोलिस मुख्यालयात, स्मृति स्तंभासमोर ‘स्मरण सोहळ्याचे’ पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले जाते, मान्यवरांच्या हस्ते शहीद स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांचा सन्मान केला जातो. त्याच बरोबर ‘शोकशस्त्र’ करून वर्षभरामध्ये जे पोलीस जवान शहीद झालेले आहे, त्यांच्या नावाचे वाचन केले जाते. पोलीस तुकडी कडून हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहिदांना सलामी दिली जाते.
त्यातून उपस्थित पोलीस अधिकारी- कर्मचारी, मान्यवर नागरिक यांना प्रेरणा मिळत असते.

आणि उपस्थित नागरिकांना हे देखील समजते की, देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा यज्ञकुंड आपल्या पोलिस बांधवांकडून अखंडपणे धगधगता ठेवला जातो म्हणूनच आपण घरामध्ये रात्री शांत झोपू शकतो; परंतु तो सुरक्षेचा यज्ञकुंड सहजासहजी पेटत नाही; तर अनेक विरांच्या देहाचे दान घेत असतो.त्यामध्ये आपल्या वीर जवानांचे रक्ताचे आणि हाडांची समिधा वाहिली जाते; म्हणूनच सुरक्षेचा हा अंतरीक यज्ञकुंड अखंडपणे धगधगत असतो.

आणि “त्यातून निघालेल्या अग्निज्वाळेतून कसाब सारखे आतंकवादी, समाजकंटक, देशद्रोही राख होत असतात.”

शृंगार से पहले मैं अंगार लिखता हू
इश्क से पहिले मैं इन्कलाब दिखता हू
कोई पुछे अगर मेरी मोहब्बत का नाम क्या है
तो मेरे खूनोकलमसे मैं मेरी भारत माता का नाम लिखता हू

जय हिंद जय महाराष्ट्र
पो.ना. विनोद पितांबर अहिरे
९८२३१३६३९९
[२२:०१, २२/१०/२०२०] दिलीप जैन.:

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

राज्यात लवकरच ग्रामपंचायतीच्या निवडणूकींचा धुराळा

Next Article

माळी समाजाचे ओबीसी नेते अनिल महाजन यांचा ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • Uncategorizedमहाराष्ट्र

    एबीपी माझा चॅनलच्या दोन पत्रकारांवर शिर्डी संस्थान प्रशासनाने दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या – प्रविण सपकाळे जळगाव जिल्ह्याचे ...

    February 2, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    प.पू.प.म.आचार्य प्रवर श्रीयेळमकर नवे बाबाजी यांच्या महंती वर्षपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न..

    March 17, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    स्वताचे दुःख विसरून स्वतःच्या डोळ्यातील अश्रू लपवत पूरग्रस्तांचे अश्रू पुसणारा आमदार किशोर आप्पा पाटील.

    September 2, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    (आरोग्य राज्यराष्ट्रीय) महाराष्ट्रातील कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त घातक

    February 23, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorized

    पाचोरा ते अंबे वडगाव १६ किलोमीटर अंतराच्या दरम्यान २२ गतिरोधक अपघाताची मालिका सुरुच.

    August 17, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorized

    गुरांचा बाजार बंद पण व्यापार सुरु, गुरे वाहतूकीला बंदी घालावी.

    September 15, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • प्रासंगिक

    एक बहिण गमावली असली तरी दुसरी बहिण तुमच्या पाठीशी उभी आहे. डॉ. प्रियंका पाटील.

  • क्रिडा क्षेत्र.

    बास्केटबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या धैर्यशील पाटील याचा सौ. वैशाली सुर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार.

  • क्राईम जगत

    पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी केले कुऱ्हाड शिवारातील गावठी दारु अड्डे उध्वस्त. महिलावर्गातून समाधान.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज