वरखेडी येथील गुरांच्या बाजारा समोर, भररस्त्यावर वाहनांच्या रांगा मोठ्या अपघाताची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०७/२०२२
पाचोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या उपबाजार समिती वरखेडी येथे प्रत्येक गुरुवारी भरणारा गुरांचा बाजार हा महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, मध्यप्रदेश, मराठवाड्यात प्रसिद्ध असल्याकारणाने या वरखेडी येथील गुरांच्या बाजारात गुजरात, मध्यप्रदेश व मराठवाड्यातून तसेच जळगाव, धुळे, मालेगाव, मुक्ताईनगर, स्थानिक तालुक्यातील व इतर राज्यातील गुराढोरांचे व्यापारी तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव या बाजारात गुरांच्या खरेदी, विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात येतात.
सहाजिकच गुराढोरांची वाहतूक (ने, आण) करण्यासाठी त्यांना टेम्पो, ट्रक व इतर वाहनांचा वापर करावा लागत आहे. तसेच वरखेडी येथील गुरांच्या बाजारात व्यापारी मोठ्या संख्येने येत असल्याने गुराढोरांची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने सहाजिकच गुराढोरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या खुपच मोठ्या प्रमाणात असते. म्हणून वरखेडी गुरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात पशुधन आणण्यासाठी व नेण्यासाठी वाहनांचा वापर केला जातो.
गुरांची ने,आण करण्यासाठी ट्रक, टेम्पो, मिनी टेम्पो, पिकअप या वाहनांचा वापर केला जातो. म्हणून वरखेडी येथील गुरांच्या बाजारात बुधवारपासूनच गुराढोरांची आवक सुरू होते. व ही गुरे घेऊन आलेली वाहने जामनेर, पाचोरा रस्त्यावर वरखेडी ते लोहारी दरम्यान भररस्त्यावर दुतर्फा उभी केली जातात. या कारणांमुळे वाहनांची वर्दळ लक्षात घेता रहदारीला मोठा अडथळा निर्माण होऊन वाहतूक विस्कळीत होत आहे.
महत्त्वाचे म्हणजे या गुरांच्या बाजारासमोर वाहने उभी असल्याने अत्यावश्यक कामासाठी जाणाऱ्या लोकांना तसेच एखाद्यावेळी दवाखान्यात रुग्ण नेण्यासाठी अडथळा निर्माण होतो. समोरासमोर वाहने आल्यानंतर वाहने काढण्यासाठी जागा नसल्याने वाहनधारकांना ताटकळत उभे रहावे लागते व यातूनच वादविवाद होतात. याच गडबडीत वाहने चालवतांना कटबाजी होते, किंवा एकमेकांच्या वाहनाला धक्का लागून भांडणे होतात. तरी ही अडचण लक्षात घेऊन या रस्त्यावरील दुतर्फा उभी रहाणारी शेकडो वाहने येथून हलवण्यात यावीत अशी मागणी होत आहे.
कारण वरखेडी उपबाजार समितीचे आवारात स्वतंत्र वाहनतळ असून या वाहनतळावर ही वाहने उभी करणे अपेक्षित व क्रमप्राप्त असतांना
मात्र ही वाहने बाजार कमिटीच्या आवारातील वाहनतळावर उभी केल्यास आपल्याला बाजार समितीचा कर भरावा लागेल, म्हणून हे वाहनधारक फक्त बाजार समितीचा वाहन कर चुकवण्यासाठी भररस्त्यावर आपली वाहने उभी करून जनतेच्या व प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत.
ही
म्हणून अशा रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना त्वरित हटवून वरखेडी गुरांच्या बाजारातील उपलब्ध असलेल्या वाहनतळावर वाहने लावण्यासाठी सक्ती करावी व रस्त्यावर उभ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
(मागील वर्षी सुध्दा जनतेच्या आलेल्या तक्रारींची दखल घेऊन सत्यजित न्यूज तर्फे या विषयावर आवाज उठवून ही वाहने हटवण्यासाठी मागणी केली होती. परंतू तदनंतर फक्त दोनच आठवडे वाहने हटवण्यासाठी प्रयत्न केले गेले मात्र पुन्हा तोच प्रकार सुरू झाला आहे.)