सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने कुऱ्हाड वन परिक्षेत्र जंगलात वृक्षारोपण संपन्न.

सुनील लोहार.(कुऱ्हाड)
दिनांक~०६/०७/२०२२
सर्वदूर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व संवर्धनाची गरज आहे व याबद्दल जनजागृती होऊन नागरिकांनी जास्तीत, जास्त सहभाग घेऊन निसर्गसंपदा जोपासून ती जतन करणे महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने पाचोरा सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आज रोजी कळमसरा, कुऱ्हाड रस्त्यालगत असलेल्या वनपरिक्षेत्रात तसेच कळमसरा व कुऱ्हाड रस्त्यावर सुमारे चार हजार वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपनासाठी लागवड करण्याचे ठरविले आहे.
यानिमित्ताने आज दिनांक ०६ जुलै २०२२ बुधवार रोजी कुऱ्हाड खुर्द गावचे सरपंच मा. श्री. कैलास भगत, कुऱ्हाड बुद्रुक गावाचे माजी सरपंच मा. श्री. किरण पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील, या मान्यवरांना सोबत घेत व यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व पाचोरा सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने हातात टिकाव, फावडे घेऊन वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाचोरा सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल मा. श्री. डी. एम. कोळी, वनरक्षक मा. श्री. फकिरा शिवदे, वॉचमन मा. श्री. दिपक सरोदे, प्रशांत जाधव, राजरत्न भिवसने, नाना सुरवाडे, वनमजूरासह इतर निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.