प्रा.आ.केंद्र लोहारा येथे श्रीमती रूपाली गजानन क्षीरसागर यांचे वाढदिवसानिमित्त रुग्णांना सॅनेटरी नॅपकिनचे मोफत वाटप,सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समुहाचा स्तुत्य उपक्रम.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~ २६/०७/२०२२
वाढदिवस म्हटला की तो येतो जल्लोष, विनाकार वायफळ खर्च, दिखाऊपणा, परंतु या सर्व गोष्टीला फाटा देत समाजसेवक गजानन क्षीरसागर,रुपाली क्षीरसागर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने सहा वर्षापासून समाज उपयोगी उपक्रम राबवून एक नवा आदर्श समाजापुढे उभा केला आहे.
सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे श्रीमती रुपाली गजानन क्षीरसागर यांच्या वाढदिवसा निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र लोहारा येथे महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन चे वाटप करण्यात आले. माणुसकी समूह आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहून नेहमीच महिलांना आरोग्याच्या बाबतीत सदृढ करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र लोहारा येथे महिलांना सॅनिटरी नॅपकिन वाटप करून वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम पवार यांच्याकडे सोपविण्यात आले.
यावेळी श्री राजेंद्र चव्हाण औषध निर्माण अधिकारी,आरोग्यसेवक श्री परेश न्हालदे, श्री शिवदास नेटके, डीडी नेटके, आरोग्य सेविका श्रीमती खडसे मॅडम, आरोग्य सहाय्यक श्री कैलास देशमुख, परिचर श्रीमती शोभा आमोदे,श्रीमती फडणवीस, या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी समाजसेवक श्री गजानन क्षीरसागर व श्रीमती रूपाली गजानन क्षीरसागर यांचे वाढदिवसाचे शुभेच्छा देऊन आभार मानले. सदर कार्यक्रमात सर्व कर्मचारी वृंद व रुग्ण महिला माणुसकी समूहाचे सदस्य पंकज चौधरी, भिका माळी, उपस्थित होते.