आसाम येथे देशसेवा बजावत असतांना भातखंडे येथील जवान शहीद.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०७/२०२२
भडगाव तालुक्यातील गिरड येथुन जवळच असलेल्या भातखंडे या गावातील विठ्ठल पाटील यांचे सुपुत्र कै. दत्तात्रय पाटील वय (३९) हे भारतीय सैन्यदलात आसाममध्ये देशसेवा बजावत असतांना एक दुर्घटना घडून या दुर्घनेत त्यांचे दुःख निधन झाले.
या दुर्घटनेची वार्ता भातखंडे येथे माहीत पडताच भडगाव, पाचोरा तालुक्यातील गावागावातून नागरिकांनी भातखंडे येथे धाव घेऊन पाटील कुटूबीयांचे सांत्वन केले. या घटनेमुळे भातखंडे गावासह भडगाव, पाचोरा तालुक्यात शोकमय वातावरण निर्माण झाले असून पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून या दुःखात सर्व सैनिक दल पाचोरा, भडगाव तालुक्यातील सर्व जनता सहभागी असून ईश्वर पाटील कुटुंबीयांना हे दुःख पेलण्यासाठी शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Download WordPress Themes Nulled and plugins.