वरखेडी येथे गुरुवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात कडकडीत बंद.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५//०२/२०२१
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे प्रत्येक गुरुवारी आठवडे बाजार भरतो येथील गुरांचा बाजार महाराष्ट्रासह आसपासच्या राज्यातही प्रसिद्ध असल्याने लांबलांबून वराचसा व्यापारीवर्ग येत असतो याची दखल घेत कोरानाचा प्रादुर्भाव थांबण्यासाठी जाहीर झालेल्या नियमांचे पालन व्हावे म्हणून शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय वरखेडी ग्रामपंचायतीने घेतला होता व तसे जाहीर केले होते.
याची दखल घेत दिनांक २५ फेब्रुवारी गुरुवारी भरणारा आठवडे बाजारात वरखेडीच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी शासनाच्या व ग्रामपंचायतीच्या सुचनांचे पालन करुन स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवत तसेच किराणा दुकान, दुध डेअरी, औषधालये उघडी ठेवतांना सामाजिक अंतराचे भान राखून जीवनावश्यक सेवा दिली.
तसेच वरखेडीच्या बाजारात बाहेरगावाहून येणाऱ्या व्यवसाईकांना सुचना देऊन बाजारात येऊनये असे कळवण्यात आले होते. या सगळ्या उपाययोजनांची काटेकोर अमलबजावणी झाल्याने वरखेडी येथे आठवडे बाजारात एकही व्यवसाईकांनी दुकान न लावल्याने कडकडीत बंद पाळण्यात आला.
याकामी वरखेडी येथील आठवडे बाजार पुर्णपणे बंद ठेवण्यासाठी पोलिस पाटील बाळुभाऊ कुमावत सरपंच पती धनराज विसपुते. तलाठी संदीप चव्हाण. चंदु सोनवणे, सजय पाटील, योगेश चौधरी, ग्रामसेवक नंन्नवरे भाऊसाहेब. सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले तसेच पुढील सुचना येईपर्यंत कोणीही बाजाराचे दिवशी व्यवसायीकांनी आपली दुकाने घेऊन येऊ नये असे जाहीर करण्यात आले.