विज बिल थकबाकी पोटी कोल्हे गावच्या पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित. ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/०२/२०२३

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथून जवळच असलेल्या कोल्हे गावच्या पाणीपुरवठा योजनेची थकबाकी भरली नाही म्हणून विद्युत वितरण कंपनीकडून मागील आठवड्यात विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला असून पाणीपुरवठा योजनेच्या नळांना पाणी येत नसल्याने ग्रामस्थांनी आसपासच्या शेतातील तसेच गावठाण विहिरीतून पाणी घेऊन ते वापरण्यास सुरुवात केली आहे.

परंतु पाण्यात झालेल्या बदलामुळे व जवळूनच नदी वाहत असल्याने तसेच नळांना मुबलक प्रमाणात पाणी येत असल्याने या गावातील आड व विहिरी अडगळीत पडून पाण्याचा उपसा झाला नसल्याने पाणी अत्यंत दूषित झाले असून हेच पाणी कोल्हे ग्रामस्थांना त्यावे लागत आहे यामुळे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मागील तीन दिवसापासून नळाला पाणी नसल्यामुळे या विहिरींचे पाणी पिल्याने लहान मोठ्यांना सर्दी तापाची लक्षणे जाणवत असून काही लोकांना मळमळ संडास उलट्यांचा त्रास होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे जर विद्युत पुरवठा सुरू करून नळांना पाणी न आल्यास या अशुद्ध पाण्यामुळे कोल्हे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊन बिकट प्रसंगाला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वसुली थांबण्यामागची कारणे ~
सद्यस्थितीत कापूस पिकासह इतर शेतीमालांना भाव नसल्याने शेतकऱ्याच्या शेतातील शेतमाल घरात पडून आहे कोल्हे हे गाव संपूर्ण शेतकरी व शेतमजूर वस्तीचे गाव असून शेतीमाल विकल्याशिवाय शेतकऱ्यांचे कोणतेही व्यवहार होत नसून ते ठप्प झाले असल्याने सध्या तरी ग्रामपंचायतीची वसुली होणे शक्य नाही म्हणून विद्युत वितरण कंपनीने काही दिवस ग्रामपंचायतला सूट द्यावी व पाणीपुरवठा विभागाचा विद्युत पुरवठा त्वरित सुरू करावा अशी मागणी जोर धरत आहे ‌

ब्रेकिंग बातम्या