पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील बालकाच्या मृत्यूप्रकरणी तब्बल एक महिना उलटला तरीही दोषींवर कारवाई नाही.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०६/२०२२
पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील बालकाच्या मृत्यूप्रकरणी तब्बल एक महिन्यानंतरही दोषींवर कारवाई होत नसल्याने बल्लाळेश्वर युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मा. श्री. हरीभाऊ तुकाराम पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा येथील ग्रामिण रूग्णालयात १० मे २०२२ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता एका गर्भवती महिलेला प्रसुतिसाठी दाखल करण्यात आले होते सायंकाळी ६:१० वाजेच्या सुमारास या महिलेचे सीझर करण्यात आले. बाळाचा जन्म झाला त्याचे वजन साधारण ०३ किलोच्या जवळपास होते. पाचोरा ग्रामिण रूग्णालयातील वैद्यकिय विभागाने त्या महिलेचे सिझर केले हे करत असतांना बालरोगतज्ञ डॉक्टर हजर असणे गरजेचे असतांना नेमून दिलेले डॉक्टर त्याप्रसंगी हजर नव्हते.
बाळाला दुध देण्यात आले त्यानंतर बाळाने उलटी केली. श्वास घेणे व दुध घेण्यासाठी अडचण निर्माण झाली म्हणून सेवा देणाऱ्या नर्सने त्या बाळाच्या छतीवर चापटा मारून काही उपचार केले. रात्री या बालकाची तब्वेत अत्यवस्थ झाल्याने २ वाजेच्या सुमारास बालरोगतज्ञ यांनी ग्रामिण रूग्णालय गाठले व त्यांनी बाळाला जळगाव घेउन जाण्याचा सल्ला दिला. बाळाला घेऊन जात असतानाच बाळ रस्त्यातच दगावले. बाळ हे गुटगुटीत व ठणठणीत असतांना केवळ डॉक्टरांनी व्यवस्थितरीत्या लक्ष न दिल्याने बाळ दगावले असा आरोप बाळाचे वडिल सोनुकुमार यांनी केला आहे.
मृतदेह घेण्यास नकार देण्यात आला असून बालकाचे शवविच्छेदन हे धुळे किंवा जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली होती या घटनेबाबत मयत नवजात बालकाचे वडील सोनू कुमार यांनी पाचोरा पोलिसात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात
आली आहे.
तहसील व पोलीस प्रशासनातर्फे बालकाचा पंचनामा
येथील पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार वि.डी. पाटील, अमोल भोई, शेखर बोरुडे व पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटिल यांच्या •मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे, पोलीस नाईक नरेंद्र नरवाडे, दीपक सुरवाडे यांनी पंचनामा केला. बालकाचा मृतेदह जळगाव सिव्हिल हॉस्पिटल हलविण्यात आले होते.
सिव्हिल सर्जन डॉ. किरण पाटील यांनी २१ रोजी पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे भेट दिली. परंतु बालकाच्या मृत्यूस तब्बल एक महिना होत असून संबंधीत दोषींवर अद्याप पावेतो कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे सिव्हिलचा प्रथम अहवाल पाचोरा पोलीस स्टेशनला प्राप्त झाला असून दुसरा अहवाल अद्यापपावेतो प्राप्त झालेला नसून सदरील घटनेला एक महिना होत