हजारो मुलांचे पापाजी स्व. रमेशचंद्रजी व्यास अनंतात विलीन.

  दिलीपराज जैन.(पाचोरा)
  दिनांक~१८/०१/२०२३

  मरावे पण कीर्तीरूपे उरावे हि म्हण आपल्याला सांगते कि आपण किती आयुष्य जगलो हे महत्वाचे नाही पण आपण जितके आयुष्य जगलो त्यात असे काही चांगले कार्य केले पाहिजे कि लोक आपल्याला, आपल्या मृत्यू नंतर पण स्मरण करतील आणि आपली प्रशंसा करतील. मरावे पण कीर्तिरूपे उरावे हे समर्थ रामदासांचे बोधवाचन आहे. मनुष्याने मारावे नव्हे, मनुष्य हा केव्हा तरी मरणारच परंतु तरी सुद्धा मनुष्य एकप्रकारे जिवंत राहू शकतो ते म्हणजे कीर्तीच्या रूपाने. मनुष्य शरीराने जरी मरण पावला तरी तो कीर्तीरूपाने उरला पाहिजे.

  असेच एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व अमळनेर तालुक्यातील धुळे, अमळनेर रस्त्यावर मोहिनी नगर येथुन जवळच सदगुरु पब्लिक स्कूलचे संचालक मा. श्री. संजयजी व्यास यांचे स्वर्गीय वडील स्व. रमेशचंद्र व्यास स्व. रमेशचंद्रजी व्यास व मा. श्री. संजयजी व्यास यांनी मागील विस वर्षांपासून सदगुरु पब्लिक स्कूल हे सुरु केले या मागील हेतू हाच की सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी ही शाळा सुरु केली. ही शाळा सुरु करतांना अर्थ नीतीला जास्त महत्त्व न देता चांगले संस्कार व चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्यासाठी पापाजींनी शिक्षकांची नेमणूक करतांना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची चांगली गुणवत्ता व चांगल्या वर्तणूकीचे शिक्षक निवडून चांगल्या पध्दतीचे शिक्षण दिले.

  या सदगुरु पब्लिक स्कूलमध्ये वस्तीगृहासह इयत्ता पहिली पासून तर इयत्ता दहावी पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था इयत्ता पहिलीत प्रवेश घेतांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय म्हणजे पाच किंवा सहा वर्षे जेव्हा आपल्या आईच्या कुशीत झोपणारी ही लहान, लहान मुले या सदगुरु पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेऊन वस्तीगृहात रहातात तेव्हा सुरवातीला त्यांना आई, वडील, भाऊ, बहीण यांची येणारी आठवण व विशेष म्हणजे झोपतांना आईची येणारी आठवण यामुळे रडणाऱ्या मुलांना पापाजी जवळ घेऊन बसत व गप्पा, गोष्टी करत, करत त्यांना झोपी लावत.

  मुल झोपली तरीही पापाजींना झोप लागत नसे कारण लहान, लहान मुल झोपल्यानंतर त्यांच्या अंगावर पांघरुण आहे किंवा नाही. काही मुलांना रात्रीबेरात्री नैसर्गिक विधीसाठी जाणे, तहान लागली तर पाणी देणे, प्रत्येक मुलाच्या पलंगावर मच्छरदाणी लावणे, सकाळी वेळेवर जागे करणे, नैसर्गिक विधी, अंघोळ, कपडे ही दैनंदिन कामे करुन घेतांना मुलांना योग्य प्रमाणात गरम पाणी, साबण, खोबरेल तेल देणे लहान, लहान मुलांना सवय नसल्याने त्यांना अंघोळ घालणे, त्यांचा भांग पाडून देणे हे सगळ झाल्यावर त्यांना दुध, नास्ता करुन वर्गात पाठवण्यापर्यंत काळजी घेणे, एवढेच नाही तर मुलांच्या प्रकृतीची काळजी घेणे, औषधोपचार करणे ह्या सगळ्या गोष्टी पापाजी अत्यंत जिव्हाळ्याने करत असत.

  स्व. पापाजींनी मुलांना लावलेली शिस्त, संस्कार, व जिव्हाळा हे वाखाणण्याजोगे होते. कारण सुट्यांमध्ये मुल जेव्हा घरी यायची तेव्हा घरातील साफसफाई व इतर दैनंदिन शिस्त व घर, परिवारात वावरतांना झालेला कमालीचा दिसून येत आहे. पापाजींनी मुलांना लावलेला लळा मुल घरी आल्यानंतर सुध्दा दिसून यायचा कारण मुल जेव्हा घरी आई, वडील यांच्याशी गप्पा करायचे तेव्हा वारंवार आमचे पापाजी असे आहेत ते आम्हाला असा जीव लावतात अश्या गोष्टी सांगायचे तसेच मुल घरी आल्यावर एखाद्यावेळी झोपेतून उठल्यावर “पापाजी कहा हो प्यास लगी है पाणी दो” असे म्हणतात यावरुनच पापाजी मुलांची किती काळजी घ्यायचे व प्रेमाने हे पालकांच्या लक्षात येत होते.

  असे आगळेवेगळे पापाजी दिनांक १० जानेवारी २०२३ मंगळवार रोजी आम्हाला कायमचे सोडून गेले पापाजींची गेले त्यादिवशी मागील विस वर्षांपासून या शाळेत शिक्षण घेऊन पापाजींच्या तालमीत लहानाची मोठी झालेली विविध ठिकाणी मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारी तसेच डॉक्टर, वकील, शिक्षक असे बरेचसे माजी विद्यार्थी पापाजींच्या अंतिम दर्शनासाठी आली होती यावरुनच पापाजी म्हणजे एक निस्वार्थी, जनकल्याणासाठी झटणारे होते हे दिसून येते. अश्या या परोपकारी महान पापाजींना सदगुरु पब्लिक स्कूल व सत्यजित न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली.

ब्रेकिंग बातम्या