गुलाबराव भाऊ पाटील समर्थकांनी रस्ता रोको करत संजय राऊतांचा पुतळा जाळून केला निषेध व्यक्त.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०६/२०२२
सद्यस्थितीत सत्ताधारी महाआघाडी सरकारच्या राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात घडामोडी होत आहेत. यात ज्यांनी, ज्यांनी मागील पस्तीस ते चाळीस वर्षांपासून शिवसेनेत राहुन शिवसेना पक्षप्रमुख शिवसैनिकाचे पितामह स्व. बाळासाहेबांच्या यांच्या नेतृत्वाखाली रक्ताचे पाणी करतच नव्हे तर वेळप्रसंगी रक्त सांडून कारावास भोगून शिवेसेनेशी एकनिष्ठता दाखवत शिवसेना पक्षाचे बळकटीकरण व राजकारण केले आहे.
परंतु याच शिवसैनिकांवर आजची परिस्थिती का ओढवली हे शोधून व पुर्णपणे जाणून घेतल्याशिवाय या पडद्याआड झालेल्या शिवसैनिकांवर आरोप करत त्यांना पळकूटे किंवा गद्दार म्हणने योग्य ठरणार नाही असे मत व्यक्त करत व्यक्त करत चोपडा तालुक्यातील व शहरातील शिवसैनिकांनी संजय राऊत यांचा पुतळा जाळून तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच मा. श्री. गुलाबराव भाऊ पाटील यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत मा. श्री. गुलाबराव भाऊ यांना पाठिंबा दर्शवला व संजय राऊत यांचा जाहीर निषेध केला. या प्रसंगी कट्टर शिवसैनिक व भाऊंचे कट्टर समर्थक मा. श्री. आबा देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.