कनाशी येथे दोन मुलांसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०२/२०२१
भडगाव तालुक्यातील कनाशी येथील शेतात एका महिलेसह तिचा मुलगा व मुलगी यांचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सौ. गायत्री दिनेश पाटील (वय ४३) या मुलगा खुशवंत दिनेश पाटील (वय १०) आणि मुलगी भैरवी पाटील (वय ८) हे तिघे कनाशी शिवारातील आपल्या शेतात कामानिमित्त गेले होते. परंतु सायंकाळी ते घरी न परतल्यामुळे कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता त्यांचे मृतदेह विहिरीत आढळून होते.
याप्रकरणी पोलिस पाटील अनिल पाटील यांनी दिलेल्या भडगाव पोलीस स्टेशनला खबर दिली या प्रकरणी १७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक श्री.अशोकजी उत्तेकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. आनंद पटारे भडगाव पोलीस स्टेशन यांनी भेट देऊन परिस्थीतीची पहाणी केली व योग्य सुचना दिल्या असून पुढील तपास सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे करीत होते व याच कालावधीत हा प्रकार नेमका घातपात की अपघात याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती.
मात्र तपास सुरु असतांनाच या घटनेची खबर मयताचे वडील दिलीप पुंडलीक पाटील. राहणार वाघाडी ता. शिंदखेडा जिल्हा धुळे यांना कळवण्यात आली ही माहिती मिळताच मुलीच्या वडीलांनी कनाशी येथे धाव घेतली. कनाशी येथे आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीचा व नातवंडांचा मृतदेह पाहताच हंबरडा फोडला.
सदरची परिस्थिती पाहिल्यानंतर मुलीचे वडील दिलीप पाटील यांनी जावाई दिनेश निंबा पाटील, सासू पमा निंबा पाटील, जेठ बबन निंबा पाटील व जेठानी सौनी बबन पाटील. हे थ्रेशर मशिन घेण्यासाठी ५०००/०० रुपये तसेच कनाशी येथे प्लाट घेण्यासाठी १,५०,००/०० रुपयांची वारंवार मागणी करुन पैसे मिळावेत म्हणून तिला शिवीगाळ करुन मारहाण करत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याने माझी मुलगी गायत्री हीला त्रास असाह्म झाल्याने तिने दिनांक २४ फेब्रुवारी बुधवारी सायंकाळी सहावाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातील विहिरीत तीची दोन मुले खुशवंत व भैरवी यांना घेऊन आत्महत्या केली अशी फिर्याद फिर्याद दिल्याने वरिल आरोपी विरुद्ध ३०६, ४९८, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.