बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे हरीभाऊ पाटील यांचे उपोषण सुरु.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०६/२०२२
पाचोरा येथील बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. हरीभाऊ पाटील यांनी दिनांक १३/०६/२०२२ सोमवार पासुन उपोषणाला बसले असुन त्यांनी पाचोरा ग्रामिण रूग्णालयात जन्मलेल्या नवजात बाळाच्या मृत्युस कारणीभुत असलेल्या पाचोरा ग्रामिण रूग्णालयातील दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी म.जि.सि. सर्जन सो. जळगांव यांनी पाचोरा पोलीसांना तात्काळ आदेश करावेत, म. पोलीस निरिक्षक सो. पाचोरा यांनी पाचोरा ग्रामिण रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बाळाच्या मृत्युस जबाबदार •असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करावी, म.जि.सि. सर्जन सो. जळगांव यांनी मयत बाळाचा शवविच्छेदन रिपोर्ट तसेच फॉरेन्सिक लॅबचा तपासणी अहवाल (रिपोर्ट) पाचोरा पोलीसांना गुन्हा दाखल करण्यासाठी तात्काळ सादर करावा, पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील महिलांची प्रसुतीच्यावेळी (शिजरसाठी) सतत २०००/- ते २५००/- रुपयांची मागणी करणाऱ्या रुग्णालयातील लाचखोर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत.