कुडाळ

कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्ष विज्ञान आयटी शाखेत शिक्षण घेणाऱ्या इविशा डिसोजा या विद्यार्थिनीची चोरीला गेलेली बॅग पोलिसांनी मोबाईल लोकेशन वरून अवघ्या काही तासात चोरी उघड झाली. बॅग चोरी करून गेलेला ३० वर्षे तुषार उर्फ शंकर श्रीराम माळकर हा युवक कारिवडे पेडवेवाडी येथील रहिवासी आहे.

कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या दाभोली येथील इविशा डिसोजा या विद्यार्थ्यांची बॅग महाविद्यालयांमधून चोरीला गेली होती. यामध्ये रोख रक्कम व मोबाईल होता. महाविद्यालयात असलेल्या सीसीटीव्ही द्वारे चोरी करणाऱ्या इसमाची छबी कॅमेराबद्ध झाली होती मात्र हा युवक या ठिकाणचा नसल्याचे दिसून येत होते कुडाळ पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीनंतर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मंगेश जाधव व त्यांच्या सहका-यांनी तपासाला सुरुवात केली चोरीला गेलेला मोबाईल सुरू असल्यामुळे मोबाईल लोकेशन वरून शोध काढणे सोपे झाले ही बॅग चोरून हा युवक मालवण- कट्टा येथे गेला आणि त्या ठिकाणी पोलिसांनी जाऊन त्याला पकडले. त्याच्याजवळ असलेल्या बागेतील मोबाईलसहित वस्तू आढळून आल्या. काही रोख रक्कम त्याने खर्च केल्याचे सांगितले. गुन्हा दाखल झाल्यापासून काही तासांमध्ये हा गुन्हा उघड होऊन चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांना मिळाला.