शेंदुर्णी ते पाचोरा रस्त्यावर खड्डेच खड्डे
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
जामनेर ते पाचोरा महामार्ग १९ वर शेंदुर्णी ते पाचोरा दरम्यान, खड्डेच खड्डे पडले असून या रस्त्यावरून जातांना खड्यात रस्ते का रस्त्यावर खड्डे आहेत असा प्रश्न पडतो. मागे काही दिवसापासून या रस्त्यावर डागडुजी करण्यात आली, मात्र ति थातुरमातुर करण्यात आल्याने अजुनच डोकेदुखी वाढली असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे.खड्यात बारीक खडी न टाकता मोठमोठे दगड ,वाळू व दगडाचा कच टाकण्यात आला मात्र त्यावर डांबर नसल्याने या ठिकाणी दुचाकी व इतर वाहने घसरुन दररोज अपघाताची मालिका सुरु आहे.तरी या रस्त्याचे त्वरित नुतनीकरण करण्यात यावे,अन्यथा एखाद्या वेळेस मोठा अपघात होऊन जिवीतहानी होऊ शकते अशी भिती व्यक्त केली जात असून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत
Download WordPress Themes Nulled and plugins.