महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा उद्या जिल्हा दौरा भाग १
महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा उद्या जिल्हा दौरा भाग १
दिलीप जैन. ( पाचोरा )
महाराष्ट्र माळी समाजाच्या विविध समस्या व माळी समाजाचे विविध उपक्रम राबवण्यासाठी समाजात जनजागृती व समाज संघटन करण्यासाठी संघटनेची गरज भासते म्हणून उद्या महाराष्ट्र माळी महासंघ जिल्हा दौऱ्यावर येत असून कार्यक्रमाची रुपरेषा सांगून जास्तीत जास्त संखेने माळी समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन माळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी केले आहे
महाराष्ट्र माळी समाज महासंघ विविध पदाधिकारी निवड, तालुकाध्यक्ष निवड कामी महासंघाचे प्रदेश्याध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर, विदर्भ प्रभारी डॉ नलिन महाजन, ऍड वैशालीताई महाजन, जिल्हाध्यक्ष शामराव पाटील सर, मा. जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सौ संध्याताई माळी, सौ प्रेरणाताई महाजन, युवक जिल्हाध्यक्ष गौरव हिलाल (बाळू मामा) महाजन दौऱ्यात सहभागी होणार असून जामनेर बैठक आयोजन सुरेश महाजन सर, नरेश महाजन. बोदवड बैठक आयोजन कैलास भाऊ माळी, दिलीप माळी. वरणगाव बैठक आयोजन संतोष माळी. मुक्ताईनगर बैठक आयोजन राजेंद्र माळी, भागवत बोंबटकर. रावेर बैठक आयोजन प्रल्हाद महाजन, विनोद उखर्डू पाटील. साखळी (यावल) बैठक आयोजन दिनकर माळी, संजय पाटील, गणेश माळी यांनी केलं आहे. तरी बैठकांना त्या त्या तालुक्यातील समाज बांधवांनी उपस्थित रहावे, अस आवाहन जिल्हाध्यक्ष शामराव भाऊराव पाटील सर यांनी केलं आहे.
रविवार दि १ नोव्हेंबर २०२०
सकाळी ९:३० जामनेर,
सकाळी १०:४० बोदवड,
दुपारी १२:०० वरणगाव (भुसावळ),
दुपारी १:०० मुक्ताईनगर
दुपारी ३:३० रावेर
संध्याकाळी ५:३० साखळी (यावल)