ऐकावे ते नवलच, तीन महिन्याचे शेळीची पिल्लू देतेय दुध.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील वरखेडी गावाजवळील भोकरी येथे एका कहाकर समाज बांधवाने पाळलेल्या शेळीने एका पिलाला जन्म दिला आता हे मादी जातीचे पिल्लू जन्मल्यानंतर सातव्या दिवशी त्याच्या अवयवांमध्ये कमालीचा बदल होत असल्याचे आढळून आले. या नुकत्याच जन्मलेल्या पिलाचे स्तन सुजल्यासारखे दिसु लागले म्हणून घरातील व्यक्तींनी स्तन दाबुन पाहिले असता त्यातून दुधासारखे द्रव निघाले ही परिस्थिती पाहून शेळी मालकाने त्या पिलासह वरखेडी येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी केली. तेव्हा पुढे हि समस्या निघून जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र हे बकरीच (शेळीचे) पिल्लू आज तीन महिन्याचे झाले असून ते आजही दिवसातून दोन ते तीन वेळा पन्नास मिली दुध देत असल्याने वरखेडी, भोकरी गावपरिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. परंतु या अगोदरही बोकड दुध देत असल्याचे आढळून आले आहे.
तालुका पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. महाजन.
सद्यस्थितीत वातावरणात झपाट्याने बदल होत असल्याने वाढते उष्णतामान व जनावरांच्या खाण्यात येणारा हायब्रीड चारा तसेच धान्य महत्वाचे म्हणजे घरात आणलेल्या भाजीपाल्याचा टाकाऊ भाग हे खाण्यात येत असल्याकारणाने जनावरांमध्ये असा बदल होत असल्याचे दिसून येते आहे. कारण भाजीपाला व फळे पिकवतांना वापरण्यात येणारे रासायनिक खते, जंतुनाशके व लवकरात लवकर वाढ व्हावी, भाजीपाला हिरवागार दिसायला पाहिजे म्हणून वापरले जाणारी घातक रसायने यामुळे जनावरांसह मानवजातीवर याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. व हा हार्मोनचा प्रभाव असू शकतो असे सांगितले.