लाईनमन अविनाश राठोड याची बदली झाल्याने, अंबे वडगाव करांची साडेसाती संपली.

Cameron, LA 11-17-05 Lineman Marion Chappell from Utah repairs damaged powerr wires wipped out by Hurricane Rita. FEMA is helping Local governments get Roads, Bridges, and Utilities back in operation so residents can move back. MARVIN NAUMAN/FEMA photo

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/१२/२०२२

पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, कोकडी तांडा व वडगाव जोगे या गावांसाठी विद्युत वितरण कंपनीकडून अविनाश राठोड याची लाईनमन या पदावर मागील पाच वर्षांपासून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु अविनाश राठोड याने अंबे वडगाव येथील पदभार स्वीकारल्यानंतर मुख्यालयात कधीच नियमितपणे येऊन कामकाज पाहिले नाही किंवा नियमितपणे मुख्यालयात हजेरी लावली नव्हती. थोडक्यात सांगायचे झाले तर कधीतरी धुमकेतू सारखा चेहरा दाखवून फक्त आणि फक्त सह्या करुन पगार लाटणारा कर्मचारी होता असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

यामुळे वरील गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला किंवा काही तांत्रिक बिघाड झाला तर विद्युत ग्राहकांना अनेक अडीअडचणीला सामोरे जावे लागत होते. तसेच विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर पिठाच्या गिरण्या, शेती पंप तसेच घरातील विद्युत उपकरणांचा वापर करता येत नसल्याने ग्रामस्थांना अंधारात राहून वेळ काढावा लागत होता. यामुळे अविनाश राठोड याची बदली करण्यात यावी याकरिता ग्रामस्थांनी अंबे वडगाव व अंबे वडगाव खुर्द ग्रामपंचातीच्या ग्रामसभेत तक्रार दाखल करुन अविनाश राठोड याची त्वरित बदली करण्यात यावी यासाठीचा ठराव मंजूर करुन घेत वरखेडी कनिष्ठ अभियंता व मुख कार्यकारी अभियंता पाचोरा व वरिष्ठांकडे पाठवल्यानंतर सुध्दा बदली होत नसल्याने ग्रामपंचायतीने सतत पाच ठराव पाठवल्यानंतर सुध्दा बदली केली जात नसल्याने पाचोरा विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी याची पाठराखण करत असल्याचा आरोप जनतेतून केला जात होता.

कारणही तसेच होते ग्रामसभेच्या माध्यमातून दिलेल्या ठरावाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार खो देत राठोड याची बदली करत नसल्याने त्रस्त विद्युत ग्राहक सरतेशेवटी येत्या आठवड्यात वरखेडी येथील कनिष्ठ अभियंता व पाचोरा येथील राठोड यांना साडी, चोळी व बांगड्यांचा आहेर देऊन विद्युत वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराबाबत निषेध नोंदवण्यासाठी जाणार होते.

परंतु आता मिळालेल्या माहितीनुसार अविनाश राठोड याची बदली झाली असल्याचे वृत्त माहीत होताच अंबे वडगाव येथील विद्युत ग्राहकांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले व निषेधाचे आंदोलन छेडणार नसल्याचे जाहीर केले असून विद्युत ग्राहकांची साडेसाती संपली अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच अंबे वडगाव येथे चांगल्या होतकरु कायमस्वरूपी मुख्यालयात हजर राहणाऱ्या कर्मच्याऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या