गावठी डुकरांचा बंदोबस्त न झाल्यास अंबे वडगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावात गावठी डुकरांचा उपद्रव वाढला असून या डुकरांचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी येत्या १५ जून २०२२ बुधवार पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे दिलीप जैन यांनी जाहीर केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबे वडगाव गावात मागील दहा वर्षांपासून गावठी डुकरांचा उपद्रव वाढला आहे. या गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार अर्जफाटे व तक्रार करुनही काहीएक फायदा होत नसल्याने येत्या १५ जून २०२२ बुधवार रोजी अंबे वडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिलीप जैन आमरण उपोषणाला बसणार आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अंबे वडगाव गावात गावठी डुकरांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली असून ही डुकरे अन्न शोधण्यासाठी दिवसरात्र गावभर फिरत असतात परंतु अंबे वडगावात सांडपाण्याच्या गटारी भुमिगत बनवलेल्या असल्यामुळे तसेच गावात सार्वजनिक व वैयक्तिक शौचालयांचा वापर केला जात असल्याने या डुकरांना खाण्यासाठी काहीही खाद्य मिळत नसल्याने ही डुकरे खाद्य मिळवण्यासाठी थेट घरात घुसतात किंवा गल्लीतल्या मुलांवर झडप घालतात व रात्रंदिवस गल्ली बोळात धिंगाणा घालत असतात तसेच याच डुकरांची शिकार करण्यासाठी गावातील कुत्रे यांच्यावर हल्लाबोल करतात यातूनच डुकरे व कुत्र्यांचा गावभर धिंगाणा घालत असल्याने गावातील रहिवासी धास्तावले आहेत. या प्रकारामुळे लहान मुलांना गल्लीबोळातून फिरणे मुश्किल झाले आहे.
(महत्वाचे म्हणजे आता पावसाळा सुरू झाल्यावर गावाच्या आसपासचे शेतकरी आपल्या शेतात लाखमोलाचे बि, बियाणे टाकतात परंतु ही गावठी डुकरे हे बि, बियाणे नष्ट करत असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसतो व बारा महिन्यांचे शेती उत्पन्नाचे बजेट कोलमडते यामुळे शेतकऱ्यांना लाखों रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
तसेच अंबे वडगाव या गावात शंभर टक्के शेतकरी वर्ग रहात असल्याने या शेतकरी कुटुंबाती लोक आपल्या जनावरांसाठी चारा साठवणूक करतात मात्र ही मोकाट डुकरे या चाऱ्याची वाट लावतात तसेच गुरा, ढोरांपुढे टाकलेला चारा किंवा ढेप यांच्यावर ताव मारतात या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी गुरेढोरे पाळणे बंद केले आहे. विशेष म्हणजे शेतकरीवर्ग शेतात गेल्यानंतर ही डुकरे दरवाज्याला धडक देऊन थेट घरात घुसतात व घरातील धनधान्याची नासाडी करतात या सर्व त्रासाला ग्रामस्थांनी वैतागून या गावठी डुकरांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार अर्जफाटे व तक्रारी केल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतीने संबंधित डुकरांच्या मालकाला वारंवार नोटीस बजावली आहे. मात्र संबंधित डुकरांच्या मालकावर कडक कारवाई होत नसल्याने काहीएक फायदा होत नाही व ग्रामस्थांना सतत त्रास सहन करावा लागत असल्याने सरतेशेवटी आंदोलनाची वेळ आली असल्याने दिनांक १५ जून २०२२ बुधवार पासून दिलीप जैन अंबे वडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.