वडगाव आंबे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत महा विकास आघाडीच्या नम्रता पॅनलचा दणदणीत विजय.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०६/२०२२
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी संचालक मंडळाचा पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणुकीत लोकसहकार पॅनलवर मात करत महा विकास आघाडीच्या नम्रता पॅनलचे १३ पैकी १३ उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.
पाचोरा तालुक्यातील वडगाव आंबे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत नम्रता पॅनलचे १३ उमेदवार व लोकसहकार पॅनलचे १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणूकीसाठी आज दिनांक ०५ जून २०२२ रविवार रोजी मतदान घेण्यात आले. मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदान केले. दोघेही पॅनलचे उमेदवार, हितचिंतक दिवसभर आपापल्या पॅनलला जास्तीत, जास्त मते कशी मिळतील याकरिता प्रयत्नशील होते.
मतदान शांततेत पार पडले सायंकाळी मतमोजणी होऊन यात नम्रता पॅनलने १३ पैकी १३ उमेदवार भरघोस मते मिळवून विजयी झाले व आपल्या प्रतिस्पर्धी लोकसहकार पॅनलला पराभूत केले. या निवडणुकीत नम्रता पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे सर्व साधारण मतदारसंघातून चव्हाण गबरु मांगो, चव्हाण प्रेमसिंग मुलचंद, हटकर वामन लक्ष्मण, मराठे गुणवंत ओंकार, पाटील राजु सुकलाल, पवार विकास रतन, राठोड अनिल राजाराम, राठोड भुमेंद्रसिंग भिमसिंग, जाधव सदू मांगो, जाधव नाना गोटिराम, महिला राखीव मतदारसंघातून चव्हाण संगीता प्रवीण, राठोड लिलाबाई उत्तम, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) मतदारसंघातून पाटील संजय प्रभाकर, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून चव्हाण शिवदास पदम, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून निकम अविनाश पंडित असे उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले असून
प्रतिस्पर्धी लोकसहकार पॅनलचे सर्व साधारण मतदारसंघातून जाधव रणजीत मदन, मराठे भास्कर आनंद, पाटील नाना राजाराम, राठोड चरणसिंग महारु, राठोड देविदास दुधा, राठोड सचिन सरदार, शिंदे अमोल रायबा, वंजारी आत्माराम भावडू महिला राखीव मतदारसंघातून मराठे विमलबाई कौतिक, इतर आगास वर्ग (ओ.बी.सी) मतदारसंघातून गायकवाड मंगेश वसंत, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून पवार अरुण बाबुराव, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून कांबळे ज्योतीराम सिताराम हे पराभुत झाले आहेत.
महा विकास आघाडीच्या नम्रता पॅनलचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.