नगरदेवळा ग्रामपंचायतीसाठी ६७% मतदान.

पाचोरा तालुक्यातील मोठ्या लोकसंखेचे गाव नगरदेवळा
येथील ग्रुपग्रामपंचायतीच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ६७% नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला .एकूण १२८२६ पैकी ८५७९ इतके मतदान झाले. सहा प्रभागातील सतरा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल ३९ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान पेटीत बंद झाले. संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. परंतु मतदान प्रक्रियेसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांची जेवणाची कुठलीच व्यवस्था झाली नसल्याने प्रस्तुत कर्मचाऱ्यांनी दैनिक पुण्यनगरी प्रतिनिधी कडे आपला रोष व्यक्त केला .यासंदर्भात नायब तहसीलदार संभाजी पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी शासन स्तरावरून कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भत्त्यात याचा समावेश असल्याचे सांगितले .तर असा कुठलाही भत्ता आम्हांला मिळाला नसल्याचे कर्मचारी यांनी सांगितले.निवडणुकीसाठी पो. नि. किसनराव नजन पाटील, गणेश चौबे, दत्तात्रय नलावडे यांच्या देखरेखीखाली नगरदेवळा औट पोस्टच्या पोलिस बांधवांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.