लोहारा, कुऱ्हाड जिल्हापरिषद गटातून निवडणूकीसाठी, अरुण पवारांची जय्यत तयारी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०३/२०२२
नुकताच पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधासभा, लोकसभेच्या निवडणूकींचा बिगुल वाजला या निवडणूका कधी होतील हे आज निश्चित नसले तरी या निवडणुकीत आपल्या हाती सत्ता कशी येईल किंवा कशा पद्धतीने कायम टिकून राहील याकरिता सत्ताधारी, विरोधी प्रयत्नशील असतांनाच अपक्ष व नवनवीन चेहेरे सर्वच कामाला लागले दिसून येत आहेत.
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील सेवानिवृत्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी व स्व. भिवसिंग फत्तु पवार माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन, जय अंबिका शिक्षण प्रसारक मंडळ बदलापूरचे अध्यक्ष, जयं अंबिका पाणी वापर संस्था अंबे वडगाव अध्यक्ष मा.श्री. अरुण भाऊ बाबुराव पवार हे येत्या जिल्हापरिषद निवडणुकीत लोहारा, कुऱ्हाड गटातून उमेदवारी करणार असल्याचे निश्चित झाले असून मी ही निवडणूक लढणारच असे जाहीर केले आहे. याकरिता जनमत जाणून घेण्यासाठी त्यांनी गावागावात जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन एक प्रकारे आपली मोर्चे बांधणी सुरु केली आहे.
मागील निवडणुकीत मा.श्री. अरुण भाऊ पव यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी देण्यासाठी मागणी केली होती. परंतु त्यावेळी त्यांना थांबवण्यात आले होते. परंतु या निवडणुकीत मला पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी मी अपक्ष उभा राहून ही निवडणूक लढवणारच असे मत सत्यजित न्यूजकडे व्यक्त केले आहे.
मा.श्री. अरुण भाऊ पवार हे समाजासाठी सतत झटत असतात. ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी अंबे वडगाव येथे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्व.भिवसिंग फत्तु पवार विद्यालय सुरु केले आहे. तसेच त्यांनी आजपर्यंत बंजारा समाजाच्या अनेक अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच समाजासाठी मोलाची कामगिरी केली आहे. यात बंजारा समाजातील लोकांना जातीचे दाखले देतांंना त्या प्रमाणपत्रावर (वंजारी) असे लिहिले होते. यावेळी गोपीनाथजी मुंडे व सुधारराव नाईक यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावून बंजारा समाजबांधवांना एकप्रकारे न्याय मिळवून देत यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत.
तसेच लोहारा, कुऱ्हाड जिल्हापरिषद गटात लोहारा, कासमपूरा, कळमसरा, शहापुरा, म्हसास, अंबे वडगाव, कुऱ्हाड खुर्द सार्वे बु. प्र.लो. जामने, भोकरी, अंबे वडगाव बुद्रुक, अंबे वडगांव खुर्द, जोगे तांडा, कोकडी तांडा, कुर्हाड बुद्रुक, नाईक नगर, लाख, रामेश्वर, म्हसास तांडा या गावांचा समावेश असून या गावात जवळपास बंजारा समाजाचे आठ हजार मतदान असून माझ्या सामाजिक व वैयक्तिक संबधामुळे जास्तीत जास्त मते मला मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.