पिंपळगाव हरेश्र्वर बुद्रुक गुरुगोविंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत नम्रता पॅनल व शेतकरी विकास पॅनल मैदानात.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०५/२०२२
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर (बुद्रुक) येथील गुरुगोविंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या २०२२ ते २०२७ पंचवार्षिक या निवडणुकीत सभासदांच्या हितासाठी व संस्थेच्या प्रतिष्ठेसाठी आम्ही निवडणूक लढवत असल्याचा फतवा घेत नम्रता पॅनल मैदानात उतरले असून सोसायटीच्या सभासदांना आम्हालाच मतदान करा असे साकडे घालत आम्हाला जास्तीत जास्त मतदान करुन आपल्या सोसायटीच्या भरभराटीला हातभार लावण्यासाठी आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन केले जात आहे. तसेच संस्थेच्या व सभासदांच्या हितासाठी जाहिरनामा काढून सभासदांच्या समोर ठेवून आम्ही जाहीरनाम्यातील सर्व अटी, शर्ती पूर्ण करु असे सांगून मते मिळवण्यासाठी सभासदांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
हि निवडणूक जरी सहकार क्षेत्रातील असली तरी या निवडणुकीचे गणित भविष्य येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हापरिषद निवडणूकीसाठी महत्वाचे ठरणार असल्याकारणाने नम्रता पॅनलच्या माध्यमातून कपबशी हे निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असून आजपासून प्रचाराला सुरुवात झाली आहे.
या पंचवार्षिक निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल हे पतंग या चिन्हावर तर नम्रता पॅनल हे कपबशी या चिन्हावर निवडणूक लढवत असून या नम्रता पॅनलच्या सर्वसाधारण मतदार संघातून बालु तुळशीराम बडगुजर, ज्योतीलाल मोहनदास चव्हाण, राजेंद्र शंकर गिते, जयप्रकाश रतिलाल जैन, अनिस हाजी भैय्या खाटीक, राजधर माधव मालकर, शालिग्राम ओंकार मालकर, विजयसिंग धर्मा नाईक, महिला राखीव मतदारसंघातून जयश्री सुनील बडगुजर, भिमाबाई तोताराम पाटील, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून सुनील संपत क्षिरसागर, सुरेश दत्तात्रय भडांगे हे निवडणूक लढवत आहेत.
दोघेही पॅनलमध्ये मुरब्बी, राजकीय डावपेचांचा अभ्यास असलेले मार्गदर्शक व उमेदवार असल्याकारणाने ही निवडणूक चुरशीची व प्रतिष्ठेची ठरणार असल्याकारणाने आपापल्या परीने मोर्चेबांधणी सुरु आहे.