पाचोरा तालुक्यात अलीबाब व चाळीस चोरांची टोळी सक्रिय
दिलीप जैन. पाचोरा
पाचोरा तालुक्यातील गावागावात ग्रामपंचायतीच्या चौदावा वित्त आयोगाचे माध्यमातून विविध विकासकामे करण्यासाठी निधी उपलब्ध झाला असून या निधीतून अंतर्गत रस्ते,सांडपाण्याच्या भूमिगत गटारी व विविध विकासकामे सुरु असून
पैकी काही ग्रामपंचायत मध्ये ही कामे दिलेल्या अटी,शर्ती व नियमांचे पालन न करता ठरवून दिलेल्या बजेटनूसार केली जात नसल्याने गावागावातील सुज्ञ नागरीक नाराजी व्यक्त करत करत आहेत मात्र सत्ताधारी व संबंधित कामावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त असलेले इंजिनिअर हे या हिन दर्जाचे होणाऱ्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून जनतेतून तिव्र नाराजी व्यक्त केलीजात असून मर्जीतील ठेकेदारांना कामे देऊन ही कामे होत असल्याने कमिशनचा फंडा वापरला जात असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे.
तसेच ह्या कामाचे ठेके देतांना बऱ्यापैकी ही विकासकामे एखाद्या मान्यताप्राप्त ठेकेदाराला हातचे धरून किंवा पदाधिकारी यांचे कार्यकर्ते व नातेवाईकांना दिली असल्याने तसेच काही ग्रामपंचायतीचे सत्ताधारी,पदाधिकारी,जबाबदार अधिकारी व ईतर हे काही प्रमाणात सामील असल्याने तेरी भी चुप मेरी भी चुभ असा कारभार सुरु असल्याचे बोलले जाते व दिसून येते म्हणून
अलीबाब चाळीस चोराच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही
( हम भी नकटे , तुम भी नकटे , सब नकटो का मेला है.
एक कोई अलबेला (सच्चा) था वो आज सबसे अकेला है.)