पाचोरा महाविद्यालयात महसूल सप्ताह साजरा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०८/२०२३
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयत पाचोरा तालुका महसूल विभागाच्या वतीने महसूल सप्ताह साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महसूल प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यात आली. नवीन मतदार नोंदणी संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देऊन फॉर्म भरून घेण्यात आले.
महसूल प्रशासनाच्या वतीने पाचोर्याचे तहसीलदार प्रवीण चव्हाणके, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, गटशिक्षणाधिकारी गिरीश जगताप यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी केले. पाचोऱ्याचे उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांविषयी सखोल मार्गदर्शन केले. तर शासनाच्या वेगवेगळ्या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिक्षण विभाग सातत्याने कार्यरत आहे, असे मत पाचोऱ्याचे गटशिक्षणाधिकारी गिरीश जगताप यांनी यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. देवेंद्र पाटील व डॉ. लोकेश सोनवणे हे आरोग्य शिबिरासाठी उपस्थित होते. महसूल प्रशासनाच्या वतीने पाचोरा महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी डोमेसाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, आधारकार्ड अपडेट यासंबंधी सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाचोरा तालुका महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार रणजीत पाटील, त्यासोबतच महसूल विभागातील सर्व पदाधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा जी बी पाटील, पर्यवेक्षक प्रा एस एस पाटील, डॉ जे पी बडगुजर, प्रा स्वप्नील भोसले, तालुका क्रीडा समन्वयक प्रा गिरीश पाटील, प्रा योगेश पुरी, प्रा डॉ माणिक पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शिरीष पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा डॉ अतुल सूर्यवंशी यांनी केले तर प्रा डॉ कमलाकर इंगळे यांनी आभार मानले.