कडे वडगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ए. टी. डब्लू. कार्डधारकांना मिळतेय शुध्द व थंडगार पाणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०६/२०२३
आजच्या परिस्थितीत सगळीकडे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. बऱ्याचशा गावातील रहिवासी पाण्यासाठी वनवन भटकत आहेत परंतु याला पाचोरा तालुक्यातील कडे वडगाव हे गाव अपवाद ठरले आहे कारण कडे वडगाव हे गाव जिल्हापरिषद सदस्य माननीय मधुकर भाऊ काटे यांचे गाव असल्याने मधुकर भाऊ काटे यांनी त्यांच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मागील चार वर्षांपूर्वी एक्वा फिल्टर प्लॅन सुरु केला आहे.
तो आजतागायत अखंडित सुरू असून संपूर्ण गावाला तसेच जवळील निमखेडी व घोसला गावाला शुद्ध पाणी पुरवत आहे या एक्वा फिल्टर मधून पाणी मिळवून घेण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाला नऊशे रुपये देऊन एक पाण्याचे ए. टी. डब्लू म्हणजे एनी टाईम वॉटर कार्ड देण्यात आले आहे या कार्डधारकांना पाहिजे तेव्हा कार्ड टाकल्यावर वीस लिटर शुध्द पाण्याचा जार मिळत असल्याने कडे वडगाव सह घोसला व निमखेडी गावातील ग्रामस्थांना शुध्द पाण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली आहे.