जामनेर तालुक्याला चक्रीवादळ व पावसाचा तडाखा* शिवसेनेचे दीपक सिंग राजपूत व शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील यांनी स्वतः शेती शिवारात व गावात जाऊन केली पाहणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०९/०९/२०२१
आज जामनेर तालुक्यातील ओझर,ओझर खुर्द,हिंगणे, लहासर,रामपूर,सामरोद सह इतर भागात चक्रीवादळ आणि पावसाने प्रचंड तडाखा दिला असल्याने प्रचंड नुकसान झाले आहे, केळीच्या बागा,कपाशी,मका,तूर ही पिके पूर्णपणे आडवी पडली आहेत. तर दुसरीकडे बऱ्याचशा घरावरची पत्रे उडून घरात पावसाचे पाणी गेल्यामुळे घरातील धान्य, संसारोपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे.
सकाळी १0 वाजेची वेळ असल्याने लोकांनी कसातरी स्वतःचा जीव वाचवत पळ काढल्याने अनेकांचे जीव वाचले परंतु काही प्रमाणात गुरे- ढोरे वाहून गेल्याने तर काहींना पावसाच्या पाण्याचा तडाखा बसल्याने बरीचशी गुरे मरण पावली आहेत. तसेच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने नद्या,नाल्यांच्या काठा जवळील शेतातून पाणी वाहिल्यामुळे शेताची माती पीकासहीत वाहून गेल्याने शेतजमिनीत मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच मोठी मोठी झाडे मुळासकट उखडली गेली आहेत.
या पूरपरिस्थितीची पाहणी जिल्हापरिषद सदस्य मा.श्री. दिपकभाऊ राजपूत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा.श्री. अरुणभाऊ पाटील यांनी ओझर हिंगणे येथील शेतकरी अरूण जाधव, शरद पाटील, कोमल राजपूत, कैलास पाटील, उमराव पाटील, अनिकेत राजपूत, विलास पाटील व अमोल राजपूत. यांच्या सोबत स्वतः शेताच्या बांदावर व प्रत्यक्ष गावागावात जाऊन पहाणी केली व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धिर देत शासनदरबारी पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.