शिंदाड येथे आमदार मा.श्री.किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नाने एक नागरिकांना लसीकरणाचा लाभ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१०/२०२१
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथे पाचोर आमदार मा.श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नाने एक हजार लस उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या, डॉ.मा.श्री. मयुर पाटील यांनी आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका,मदतनीस यांना सोबत घेऊन स्वता उपस्थित राहून लसीकरणाची मोहीम पार पडली.
या लसीकरण केंद्राला माजी जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. उद्धव भाऊ मराठे, तंटामुक्ती अध्यक्ष हिलाल पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती अरुण भाऊ तांबे, सोसायटी चेअरमन व ग्रामपंचायत सदस्य समाधान पाटील, माजी सरपंच इंदलभाऊ परदेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य धोंडू आण्णा चौधरी यांनी भेट देऊन लसीकरणासाठी सतत मेहनत घेणारे डॉक्टर व सर्व टीमचे आभार मानले.
तसेच अशोक धोबी, तुषार लोधी, चुडामण भोई, हरचंद चौधरी, ग्रामपंचायत सदस्य विनोद तडवी, तकदीर तडवी, डॉक्टर राजु लोधी, पत्रकार बंधू राकेश भाऊ सुतार, भिकन भाऊ पाटील व गावातील मंडळी उपस्थित होते.