पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशनला बेवारस मिळुन आलेल्या मोटरसायकलींचा होणार लिलाव.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०६/२०२१
पोलीस अधिक्षक डॉ. प्रविणजी मुंढे जळगाव यांचे परवानगीने पिंपळगांव (हरे.) ता. पाचोरा पोलीस स्टेशनला बेवारस मिळुन आलेल्या मोटार सायकलींचा जाहीर लिलाव दि.२४ जुन २०२१ गुरुवार रोजी होणार आहे.
तरी परिसरातील इच्छुक परवानाधारक भंगार खरेदी विक्री करणारे व्यावसायिक यांनी लिलावात भाग घेवुन मोटार सायकली भंगारात खरेदी करावयाच्या आहे. त्यांनी दि.२४ जुन २०२१ गुरुवार रोजी पिंपळगांव (हरे.) पोलीस स्टेशनला हजर रहावे. लिलावात भाग घेतांना खालील अटी व शर्तीचे पालन करावे लागेल – लिलावात भाग घेणारे व्यावसायिक यांनी येतांना आपले भंगार खरेदी लायसन्स तसेच दुकानाचे लायसन्सची झेरॉक्स प्रत आणणे आवश्यक राहील. अन्यथा लिलावात भाग घेता येणार नाही.
मोटार सायकली भंगारात खरेदी करावयाच्या असल्याने त्या मोटार सायकली जागेवरच तोडावे लागेल जेणे करुन सदरचे वाहन पुन्हा रोडवर येणार नाही, लिलाव संपताच भंगार खरेदीची रक्कम लगेच पोलिस स्टेशनला जमा करावी लागेल, जो परवानाधारक व्यावसायिक जास्त रकमेची बोली बोलेल त्यालाच माल दिला जाईल, मोटार सायकली भंगारात खरेदी केल्यानंतर त्या पुन्हा रोडवर येणार नाही याबाबत शंभर रुपयाच्या स्टँप पेपरवर हमी पत्र लिहुन द्यावे लागेल, सदरचा माल आहे त्या परिस्थितीत न्यावा लागेल.
असे आवाहन पिंपळगाव हरेश्र्वर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक सौ.निताजी कायटे यांनी परवानाधारक भंगार व्यावसायिकांना केले आहे.