अंबे वडगाव परिसरातील एअरटेल ग्राहक त्रस्त, महत्त्वाचे कामांचा खोळंबा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०१/२०२१
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावाजवळ एअरटेल कंपनीचे टॉवर उभारण्यात आले आहे. मात्र हे एअरटेल कंपनीच्या टॉवरची संबधित कंपनीकडून वेळोवेळी व्यवस्थित देखभाल व निगा राखली जात नसल्याने
अंबे वडगाव, अंबे वडगाव खुर्द, अंबे वडगाव बुद्रुक, जोगे वडगाव, कोकडी तांडा, डांभुर्णी या गावातील एअरटेल ग्राहकांना तिन महिन्यांचा रिचार्ज करुन सुध्दा सुविधा मिळत नसल्याने अत्यावश्यक कामासाठी, वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी, नातेवाईकांना सुखदुःखाचे संदेश देण्यासाठी तसेच वरील सर्व गावातील शालेयविद्यार्थी, माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे तरुण, तरुणांनी ऑनलाइन अभ्यासक्रमाला मुकावे लागत आहे.
तसेच जगातील इतर घडामोडी, मोर्चे, आंदोलन, शासनाच्या सोईसुविधा, सवलती यांची माहिती वेळेवर मिळत नसल्याने त्यांनी केलेल्या रिचार्जचे पैसे कंपनी लुटत असल्याने एअरटेल ग्राहकांनी संतप्त भावना व्यक्त करत येत्या दोन दिवसात नेटवर्क मध्ये सुधारणा न झाल्यास हजारो एअरटेल ग्राहक आपले एअरटेलच्या सिमकार्डची होळी करून इतर कंपनीचे सिमकार्ड घेणार आहेत.