पकडा गया वो चोर है बाकी सब शिरजोर है, पाचोरा शहरासह तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरूच.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/०३/२०२२
टीमचा कर्णधार पकडला परंतु इतरांचे काय ?
पाचोरा शहरात ५ मार्च २०२२ शनिवार रोजी सिंधी काॅलनी भागात संशयित रित्या उभ्या असलेल्या वाहनांमध्ये गुटखा आढळुन आल्याने अन्न भेसळ प्रशासन जळगाव व नाशिक या दोन्ही पथकांनी संयुक्तिक कारवाही करत ७ लाखांचा गुटखा जप्त करित एका संशयितास ताब्यात घेत गुन्हा नोंदविणायात आला आहे.
ही कारवाई नाशिक येथिल अन्न सुरक्षा अधिकारी तथा गुप्त विभागाचे अविनाश दाभाडे आणी जळगाव येथिल अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांनी शहरातिल सिंधी काॅलनी भागात केली होती. या कारवाईत ७ लाख ७ हजार १९५ रूपये असुन दोन्ही वाहनांसह १० लाख ४७ हजार १९५ किंमतिचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तसेच एका तरूणास ताब्यात घेत या प्रकरणी पाचोरा पोलिसात अन्न सुरक्षा मनके कायद्यान्वये किशोर साळुंखे यांच्या फिर्यादिवरून गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
परंतु ही मोठी कारवाई झाली असल्याचे बोलले जात असलेतरी आजही पाचोरा शहरासह पाचोरा तालुक्यातील लोहारा, पिंपळगाव हरेश्र्वर, वरखेडी तसेच जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी, पहूर या शहरासह लहानमोठ्या गावात बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री सुरु असुन या गुटखा विक्री कडे स्थानिक जबाबदार अधिकारी व प्रशासन अर्थपूर्ण डोळेझाक करत असल्याचे सगळीकडे चर्चेत आहे. म्हणून वरील प्रकार विचारात घेता पकडा गया वो चोर है, बाकी सब शिरजोर है, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणून गुटखा विक्री बाबत सविस्तर व सखोल चौकशी होऊन संपूर्ण पाचोरा तालुका गुटखा मुक्त करावा अशी मागणी जोर धरत आहे.
विशेष म्हणजे अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्यास किंवा अशा स्वरूपाचा माल कुणीही वाहतुक करत असेल किंवा साठवणुक करत असेल तर अन्न सुरक्षा प्रशासनाला कळवावे असे अवाहन अविनाश दाभाडे आणी किशोर साळुंखे यांनी यावेळी केले असले तरी अशी तक्रार करण्यासाठी कोणीही धजावत नसल्याने पाचोरा तालुक्यात आजही अवैधपणे गुटखा विक्री राजरोसपणे सुरु असल्याने यात अल्पवयीन व तरुण मुले गुटख्याच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसत आहे.