नगरपंचायत, नगराध्यक्षपद आरक्षण सोडत गुरूवारी होणार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०१/२०२२
राज्यभरातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित करण्यासंदर्भात आज अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे. यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना एक पत्र पाठविले आहे.
त्यात म्हटले आहे की, नगराध्यक्षपदाच्या आरक्षण निश्चितीसाठी आरक्षण सोडत येत्या गुरुवारी (२७ जानेवारी) होणार आहे. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या दालनात दुपारी ४ वाजता होणाऱ्या या सोडतीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्याने या सोडतीस प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. त्यासाठी त्या त्या विभागातील महसूल आयुक्तांच्या कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोडतीला उपस्थित राहता येणार आहे. नगरपंचायतीतील १० लोकप्रतिनिधी या सोडतीसाठी ऑनलाईनरित्या उपस्थित राह शकणार आहेत.