सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

राजकीय
Home›राजकीय›पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न.

By Satyajeet News
March 7, 2022
214
0
Share:
Post Views: 49
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०३/२०२२

पाचोरा येथील महालपुरे मंगल कार्यालयत ०७ मार्च २०२२ सोमवार रोजी दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा पक्षनिरीक्षक मा.श्री. अविनाश आदिक साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार मा.श्री. दिलीप भाऊ वाघ, गटनेते मा.श्री.संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

यावेळी मार्गदर्शक मा.श्री. अविनाश अदिक यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करा यश हमखास मिळेल, पवार साहेबांचे विचार खेडोपाडी पोचवा आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती पंचायत व नगरपालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळालेच पाहिजे अशी जिद्द बाळगून बुथ निहाय कामाला लागले तर आगामी निवडणुकीत माजी आमदार मा.श्री.दिलीप भिऊ वाघ यांना यश नक्कीच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत तसा आत्मविश्वास आहे असे मत व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना सर्वसामान्यांची ताकद दाखवून द्या असे आवाहन केले.

नंतर प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, महिला जिल्हाध्यक्षा सौ. वंदना चौधरी, योगेश देसले, सौ. कल्पना पाटील, प्रतिभा पाटील, मझहर खान अरविंद मानकरी माजी आमदार दिलीप वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात आपल्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित दिला ही उपस्थिती पाहूनच आपली भविष्यात विजयाची सुरुवात झाली आहे असे कार्यकर्त्यांनी दाखवून दिले असून आपल्य स्वप्नपूर्ती करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्ष बळकटीसाठी जोमाने कामाला लागावे तसेच बरेचसे कार्यकर्ते कामाला लागले असून त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे असे मत व्यक्त केले.

आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी या भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक पदाधिकारी तसेच महिला, युवा, व्यापारी, शेतकरी ,आघाडीच्या सर्व पदाधिकारी व फ्रेंडसचे पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात नगरसेवक मा.श्री.भुषण वाघ यांनी नवीन युवकांची कार्यकारणी व पक्ष बळकटीसाठी तसेच येत्या निवडणूकीसाठी पुढील ध्येयधोरणे व आजपर्यंत केलेल्या कामांची एक पुस्तिका कार्यकर्त्यांना भेट देण्यात आली.

या मेळाव्यात पि.टी.सी. चेअरमन संजय वाघ, डॉ. संजीव पाटील, खलील देशमुख, शालिग्राम मालकर, महिला राष्ट्रवादी पदाधिकारी रेखाबाई, योजना चौधरी, नगरसेविका सुचेता वाघ, ज्योती वाघ, महिला तालुकाध्यक्ष दिशा भोसले, सुलोचना देवरे, सरला पाटील, सुनिता मांडोळे, प्राध्यापक वैशाली बोरकर, सीमा देसले, नाना देवरे, प्रकाश पाटील, नगरसेवक वासुदेव महाजन, रणजीत पाटील, प्रकाश भोसले, प्राध्यापक भागवत मालपुरे, नगरसेवक मोरे, मधुकर पाटील, अरुण देशमुख पंचायत समिती सदस्य ललित वाघ, बशीर काका बागवान, सुदाम वाघ, माणिक पाटील, नगरसेवक वाजिद बागवान, योगेश पाटील, रज्जाक भाई, पिंटू ब्राह्मणे, योगेश महाजन, नगर देवळा येथील कार्यकर्ते तसेच तालुक्यातील सर्व सरपंच, सदस्य, वि.का.सो.चे सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्ष बळकटीसाठी सगळ्यांनी कामाला लागावे असे आवाहन विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे यांनी प्रास्ताविकामध्ये करत आजपर्यंतचा लेखाजोखा कार्यकर्त्यांसमोर मांडला या मेळाव्याचे सुत्रसंचलन तालुकाध्यक्ष मा.श्री. विकास पाटील सर व शहराध्यक्ष अझहर खान यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन युवकांचे प्रमुख अभिजित पवार यांनी केले. या मेळाव्याचे औचित्य साधून कृष्णापुरी येथील बहूसंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. सुधीरजी ...

Next Article

धरणगाव येथील बालिकांचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधमाला ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    वडगाव आंबे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणूकीत महा विकास आघाडीच्या नम्रता पॅनलचा दणदणीत विजय.

    June 6, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    थोरा मोठ्यांना सोबत घेऊन गाव विकासासाठी पुन्हा जनमताचा कौल मागणार. प.स.सदस्य ज्ञानेश्वर सोनार.

    December 14, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    नगरपंचायत, नगराध्यक्षपद आरक्षण सोडत गुरूवारी होणार.

    January 25, 2022
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोऱ्यात भाजपा ने काढली ठाकरे सरकारची अंतयात्रा अधिवेशनातील १२ आमदारांचे निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या- अमोल शिंदे.

    July 6, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    शेंदुर्णी येथील विलास पाटील यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदि निवड.

    December 23, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री बावनकुळे यांचा दौरा संपन्न.

    July 25, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • दिन विशेष

    श्री. गजानन भाऊ लाधे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

  • क्राईम जगत

    सरपंच पदाच्या वादातून एकावर धारदार शस्त्राने वार, ऐन रमजान ईदच्या सणावर दहशतीचे सावट.

  • शैक्षणिक

    कु.किरण चौधरी हिची उत्तुंग भरारी, उच्च शिक्षणासाठी इटली येथे निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी केला जाहीर सत्कार.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज