राष्ट्रीय सेवा योजना (एन. एन. एस.) शिबिरात डॉ. सौ. ग्रिष्मा पाटील विद्यार्थ्यांशी यांनी साधला संवाद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०१/२०२३
पाचोरा येथील एम. एम. कॉलेज व खडकदेवळा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने खडकदेवळा खुर्द येथे दिनांक १७ जानेवारी २०२३ मंगळवार ते २३ जानेवारी २०२३ सोमवार या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) चे हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात दिनांक २२ जानेवारी २०२३ रविवार रोजी सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोराच्या संचालिका व बालरोग तज्ञ डॉ. सौ. ग्रिष्मा पाटील यांनी शिबिराला भेट देत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिक्षण घेत असतांना विशेष करुन २१ शतकात खाण्यापिण्यात होणारे बदल, मुलींचे वाढते वय, वयानुसार होणारे शारीरिक बदल व आपली जबाबदारी हे मुद्दे लक्षात घेऊन ” शिक्षण व स्री आरोग्य” या विषयावर मुलींना मोलाचे व उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. सौ. ग्रिष्मा पाटील यांनी वेळात वेळ काढून एम. एम. कॉलेजमध्ये शिबिरात येऊन मुलामुलींना योग्य असे मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल एम. एम. कॉलेजच्या वतीने प्राध्यापक मा. श्री. वळवी यांनी डॉ. सौ. ग्रिष्मा पाटील यांचे आभार मानले