सात मार्च सोमवार रोजी पाचोरा येथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०३/२०२२
सात मार्च सोमवार रोजी पाचोरा येथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महालपूरे मंगल कार्यालयात दुपारी एक वाजता भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्हा पक्ष निरीक्षक या.श्री. अविनाश राव आदिक यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात येणार असून या मेळाव्यात माजी आमदार मा. श्री.दिलीप भाऊ वाघ, गटनेते संजय वाघ हे आगामी जिल्हापरिषद, पंचायत समिती, व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करुन कार्यकर्त्यांशी हितगुज साधुन येणाऱ्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजून त्या सोडवण्यासाठी हा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक पदाधिकारी तसेच महिला, युवा, व्यापारी, शेतकरी, आघाडीच्या सर्व पदाधिकारी व फ्रेंडसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होण्याचे आवाहन विधानसभा क्षेत्रप्रमुख मा.श्री. नितीन तावडे, तालुकाध्यक्ष मा.श्री. विकास पाटील. शहराध्यक्ष अझहर खान. महिला राष्ट्रवादी पदाधिकारी रेखाबाई पाटील, युवकांचे प्रमुख अभिजित पवार. यांनी केले आहे.