बाळुमामाच्या मेंढरांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती. गेली सांगून ज्ञानेश्वरी , नं माणसा परास मेंढर बरी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०२/२०२१
(सुचना = बातमी लिहितांना आम्हाला कुणाच्याही धार्मीक भावना दुखवायच्या नसून तसेच श्रद्धा, अंधश्रद्धा हा वैयक्तिक व्यक्तीमत्वाचा विषय असल्याने आम्ही कुनाच्याही विरोधात ही बातमी लिहीत नसून फक्त आणि फक्त कोरोनाच्या संक्रमणाची भिती असल्याने तात्पुरती ही भाविक भक्तांची मंदियाळी थांबण्याची गरज असल्याने हा उठाठेव )
https://youtu.be/-1NYLxBkz1Q
हा घ्या पुरावा अडीच हजाराचे जवळपास माणसांचा जमाव.
महाराष्ट्रात बाळुमामाची मेंढर ही चर्चेतील बाब असून या मेंढरांच दर्शन घेतल्यामुळे घरातील इडा, पिडा, रोगराई तसेच शरीरातील व्याधी दुर होतात अशी भावना(समजूत)आहे. म्हणून या बाळुमामांच्या मेंढरांचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक (श्रध्दाळु)(अंधश्रध्दाळु)लोक जेथे शक्य होईल तेथे जातात व मनोभावे दर्शन घेऊन बाळुमामांच्या नावाचे नामस्मरण करत व मनातील ईच्छा प्रगट करुन समस्या सुटण्यासाठी प्रार्थना करतात.
आता योगायोगाने बाळुमामांची मेंढर पाचोरा तालुक्यातील मराठवाड्याच्याहद्दी जवळ असलेल्या वाडी, शेवाळे शिवारात आलेल्या आहेत. म्हणून आलेल्या संधीचा फायदा थेट घेण्यासाठी चाळीसगाव, मराठवाड्यातील घाटनांद्रा, हळद, डखल तसेच पाचोरा तालुक्यातील हजारो भाविक या मेंढरांच्या दर्शनासाठी सायंकाळी सात वाजेपासून रात्री उशिरापर्यंत येथे हजेरी लावतात.
या कारणांमुळे कोरोना संक्रमण थांबवण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या शासनाच्या आदेशाला खो देत वेगवेगळ्या तालुक्यातील व गावपरिसरातील लोक हजारोंच्या संख्येने एकत्र येत असल्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पंचक्रोशीतील सरपंच, पोलीस पाटील व लोकप्रतिनिधी यांनी शासन , प्रशासनाला कळवून हजारो लोक एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.