चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कठोरात, कठोर शासन व्हावे म्हणून पाचोरा तेली समाज मंडळाकडून प्रशासन अधिकाऱ्यांना निवेदन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०२/२०२२
धरणगाव शहरातील एका भागात संशयित आरोपी चंदुलाल शिवराम मराठे ( वय – ६२) याची गिरणी आहे. याच परिसरात राहणारी एक महिला दिनांक २० फेब्रुवारी रविवार रोजी दुपारी ३ वाजता आपल्या ८ आणि ६ वर्षाच्या बालिकांसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणीवर आली होती. दोघी चिमुकल्या मुली गिरणी समोरच्या अंगणातच खेळत होत्या. दळण दळून झाल्यावर घर जवळच असल्याने त्यांची आई घरी निघून गेली. मात्र मुली तेथेच अंगणात खेळत होत्या. या मुलांना एकट्या पाहून एकांतवासाचा फायदा घेत संशयित आरोपी चंदुलाल मराठे याने सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचे मुलीच्या आईच्या लक्षात आले. पीडीत मुलीच्या आई व वडीलांना धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चंदुलाल मराठे याच्यावर पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगांव येथे एका ६ वर्षाच्या अजान नाबालीक मुलीवर एका अज्ञात नराधमाने अत्याचार केल्याची दुदैवी घटना घडली असून सदरचा प्रकार घृणास्पद व माणूसकीला काळीमा फासणारा आहे. या अशोभनिय घटनेचा आम्ही तिव्र शब्दात जाहिर निषेध नोंदवित असून या प्रकरणातील मुख्य आरोपीस अटक करण्यात आलेली असली तरी त्याला कठोर शासन करण्यात यावे, पीडीत मुलीचे कुटूंबीयाना नियमाप्रमाणे अर्थिक सहाय्य देण्यात यावे, पीडीत मुलीचे कुटूंबीयांना संरक्षण देण्यात यावे. सदरचा खटला जलद न्यायालयत चालविण्यात यावा. अश्या अनेक मागणींचे निवेदनमा प्रांत अधिकारी सो. पाचोरा,
मा.तहसिलदार पाचोरा, मा.उपविभागीय अधिकारी सो पाचोरा भाग पाचोरा, पोलीस निरीक्षक पाचोरा यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष सतिष चौधरी, शहरअध्यक्ष नारायण चौधरी, उपाध्यक्ष उत्तम चौधरी, सचिव शांताराम चौधरी, सहसचिव शरद चौधरी, प्रकाश चौधरी, मोतीलाल चौधरी, प्रा.सी.एन.चौधरी, भालचंद्र चौधरी, संजय चौधरी, पंडीत चौधरी असंख्य तेली समाजबांधव उपस्थित होते.