इधर कुआँ और उधर खाई, थकीत विज बिल असलेल्या ग्राहकाचे विज कनेक्शन बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यास मारहाण.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/१२/२०२२

दोन महिन्यांपासून विज बिल थकीत असल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार शहरातील बाहेरपुरा भागात एका ग्राहकाचे विज कनेक्शन बंद केल्याचा राग आल्याने संबंधित ग्राहकाने विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यास मारहाण करत जिवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना आज दिनांक १५ डिसेंबर २०२२ गुरुवार रोजी घडली असुन विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून एका विरुध्द पाचोरा पोलिसात मारहाण, जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने व शासकीय कामात अडथळा आणला म्हणुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील मच्छी बाजार, बाहेरपुरा येथील रहिवाशी वसीम खान गुलाब खान यांचे घराचे विज बिल गेल्या दोन महिन्यांपासून थकीत आहे. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी, पाचोरा येथील वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत असलेले प्रविण सुभाष वंजारी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार थकीत विज बिल ग्राहकांचे विज कनेक्शन बंद करण्यासाठी १५ डिसेंबर २०२२ गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता शहरातील मच्छी बाजार, बाहेरपुरा भागात गेले असता या भागातील रहिवासी गुलाब खान अहमद खान यांचे घरगुती वापरासाठीचे विज मीटर असुन त्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून विज बिल थकीत असल्याने विज वितरण कंपनीचे कर्मचारी प्रविण वंजारी यांनी गुलाब खान अहमद खान यांचे विज कनेक्शन बंद केल्याचा राग आल्याने गुलाब खान अहमद खान यांचा मुलगा वसीम खान गुलाब खान याने प्रविण वंजारी यांना विज कनेक्शन का बंद केले ? अशी विचारणा केली असता प्रविण वंजारी यांनी समर्पक उत्तर देवुन ही वसीम खान गुलाब खान याने प्रविण वंजारी यांना मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याने विज वितरण कंपनीचे कर्मचारी प्रविण वंजारी यांचे फिर्यादीवरून मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी देत तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून वसीम खान गुलाब खान यांचे विरुध्द भा. द. वी. कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ नुसार पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असुन आरोपी वसीम खान गुलाब खान यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.

सद्यस्थितीत विद्युत वितरण कंपनीकडून थकीत विज बिल वसुली करण्यासाठी धडक मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु ही मोहीम राबवतांना विद्युत वितरण कंपनीच्या कर्मच्याऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. या मागील कारण म्हणजे वरिष्ठ अधिकारी हे कार्यालयात बसून सक्तीच्या विज बिल वसुली साठीचा हुकमी एक्का फेकून मोकळे होतात. हा हुखमी एक्का एवढ्यावरच थांबत नाही तर विद्युत बिल वसुली करण्यासाठी दररोज थकीत ग्राहकांची यादी दिली जाते व दिलेल्या यादीतील थकित ग्राहकांकडून एक तर थकित वीज बिल वसूल करा किंवा त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करा अन्यथा तुमच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे सांगितले जात असल्याने आजतरी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मच्याऱ्यांच्या नशिबी असा प्रसंग ओढवला आहे.

म्हणून ही सक्तीची वसुली करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मच्याऱ्यांच्या सोबत विद्युत वितरण कंपनीचे एक सक्षम अधिकारी व पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी धास्तावलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांन समोर व्यक्त केली आहे. कारण की एका बाजूला वरिष्ठांच्या आदेशानुसार सक्तीची वसुली व वसुली न झाल्यास निलंबनाची कारवाई किंवा बदली करण्यासाठी आदेश म्हणण्यापेक्षा वटहुकूम व दुसरीकडे विद्युत ग्राहकांची दादागिरी यात भरडला जाणारा विद्युत वितरण कंपनीचा कर्मचारी हा हतबल झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या