पोलीस आजतक या साप्ताहिकाचे संपादक प्रविण (बाबा) दिवटे यांचे अपघाती निधन.)

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२२
पाचोरा शहरातीलच नव्हे तर पाचोरा, भडगाव तालुक्यातील जनमानसात सुपरिचित असलेले सुस्वभावी, मनमिळाऊ स्वभावाचे संकटकाळात सर्वासाठी धाऊन जाणारे भडगाव रोड परिसरातील दत्त कॉलनी येथील रहिवासी पोलीस आजतक या साप्ताहिकाचे संपादक प्रविण (बाबा) दिवटे वय (४५) वर्षे यांचे काल दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ गुरुवार रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नाशिक रोड येथे रेल्वेच्या धक्याने रेल्वे अपघात अकस्मात निधन झाले.
या दुखद घटनेची माहिती पाचोरा शहरात कळताच छत्रपती शिवाजी महाराज चौक व महत्त्वाच्या रस्त्यावर त्यांच्या मित्रमंडळी व व्यापारीवर्ग शोकमय वातावरणात ठिकठिकाणी घोळक्याने एकत्र ऊभे राहून हळहळ व्यक्त करतांना दिसून येत होते.
प्रविण दिवटे हे गेल्या आठ दिवसांपूर्वी नाशिक येथे आपल्या कंटूंबियासह वास्तव्यास गेले होते. यांचे पाच्छात आई, वडील, एक भाऊ, पत्नी, दोन मुले असा परीवार असून त्यांचे मृत्यू प्रकरणी नाशिक येथील रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचेवर आज दि. १८ फेब्रुवारी शुक्रवारी दुपारी तीन वाजता पाचोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते पाचोरा येथील बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त सहाय्यक रामजी धनजी दिवटे यांचे मोठे चिरंजीव व युनियन बँकचे कर्मचारी संदिप दिवटे यांचे मोठे बंधू होत.