चाळीसगाव येथे भाजपा खासदाराच्या कार्यालया समोर कॉंग्रेस चे आंदोलन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/०२/२०२२
चाळीसगाव येथे देशाचे पंतप्रधान यांनी महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपा खा. पाटील यांच्या कार्यालयाबाहेर कॉंग्रेस ने जोरदार आंदोलन केले.
जळगाव जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदिपराव पवार यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव येथे जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा. उन्मेष पाटील यांच्या कार्यालयाबाहेर कॉंग्रेस ने जोरदार आंदोलन केले यात शर्म करो शर्म करो , मोदींनी माफी मागितली पाहिजे, छत्रपतींच्या महाराष्ट्राचा अपमान करणारांनी जनतेची माफी मागितलीच पाहिजे अश्या घोषणा देण्यात आल्या
याप्रसंगी जळगाव शहर अध्यक्ष शाम तायडे, पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, अशोक खलाने, चाळीसगाव तालुका अध्यक्ष अनिल निकम,शहर अध्यक्ष देवेंद्र पाटील,भागवत सुर्यवंशी, गोकुळ बोरसे (अमळनेर) महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ,राहुल मोरे, इरफान मनियार, इरफान मनियार शहर रविंद्र पोळ, शहर अध्यक्षा अर्चना पोळ, दिलीप शेंडे, मोरसिंग चव्हाण, आशुतोष पवार, अमजद मौलाना आदी उपस्थित होते.