आर्थिक अडचणीत सापडलेल्या तारखेडा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०४/२०२३
पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील रविंद्र ओंकार चव्हाण वय वर्षे (४४) या शेतकऱ्यांने सततच्या नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने दिनांक ०८ एप्रिल २०२३ शनिवार रोजी कोणतेतरी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात येताच त्याच्या घरच्यांनी त्याला ग्रामस्थांच्या मदतीला पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी तातडीने दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी रविंद्र चव्हाण याचे दुःखद निधन झाले.
रविंद्र ओंकार चव्हाण हा तारखेडा येथील रहिवासी असून थोडीशी शेतजमीन शेतजमीन राबराब राबुनही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमालाला उत्पन्नात आलेली घट व आलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आधीच आर्थिक परिस्थिती बेताची त्यातच त्याला एक अठरा वर्षे वयाची लग्नासारखी मुलगी असल्याने तिच्या लग्नाची चिंता तसेच एक मुलगा शिक्षण घेत असून त्याला शिक्षणासाठी लागणारा खर्च व दैनंदिन जीवनात लागणारा खर्च करणे अवघड झाले होते याच विवंचनेत रविंद्र चव्हाण याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
मयत रविंद्र चव्हाण याच्यामागे एक मुलगा एक मुलगी आई, वडील असा परिवार आहे.