सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • अनफिट, नादुरुस्त स्कूलबसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रादेशिक महामंडळाकडून कारवाई अपेक्षित.

  • कायद्याची राहिली नाही भीती, गोळीबार करणाऱ्या आरोपींची जामनेर पोलीसांकडे शरणागती.

  • पाचोरा बसस्थानक गोळीबारातील जखमी आकाश मोरेचा जागीच मृत्यू.

  • पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार, एक गंभीर जखमी.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूलबस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

पाचोरा तालुका.
Home›पाचोरा तालुका.›पाचोरा शहरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु.

पाचोरा शहरात पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु.

By Satyajeet News
February 14, 2022
2694
0
Share:
Post Views: 126
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/०२/२०२२

पाचोरा शहरात मुख्य रहदारीच्या रस्त्यावर तसेच मुख्य बाजारपेठेत अनेक व्यवसायीकांनी आपल्याला व्यवसायाची दुकाने थाटली होती. या अतिक्रमित विशेष करून हातगाडी व्यवसायीकांंची दुकाने रहदारीला अडथळा ठरत होती. या कारणामुळे वाहतुकीची समस्या भेडसावत होती व यातूनच वाद-विवाद होणे, अपघात होणे नित्याचे झाले होते. तसेच ज्या व्यवसायिकांनी लाखो रुपये भरून शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये आपले व्यवसाय सुरू केले होते त्या मोठ्या व्यवसायिकांच्या दुकानावर जाण्यासाठी ग्राहकांना रस्ता सापडत नव्हता या कारणांमुळे मोठ्या व्यवसायिकांचे व्यवसाय ठप्प झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच या अतिक्रमणामुळे शहराच्या सौंदर्याचे तीनतेरा वाजले होते. म्हणून या अतिक्रमणाबाबत सतत तक्रारी केल्या जात होत्या याची दखल घेत मागील आठवड्यात नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याची भुमिका घेऊन अतिक्रमण धारकांना तश्या नोटीस बजावल्या होत्या व आज रोजी प्रत्यक्ष पोलिस बंदोबस्तात पाचोरा नगरपालिकेच्या वतीने धडक मोहीम राबवून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढण्यात आले.

विशेष म्हणजे सद्यस्थितीत नगरपालिकेचा कारभार सर्वेसर्वा प्रशासक यांच्या हातात असल्याकारणाने सर्व अधिकार मुख्याधिकारी यांना असल्याकारणाने या अतिक्रमण हटाव मोहिमेत कोणत्याही राजकीय मान्यवरांचा हस्तक्षेप नव्हता असे जरी असले तरी काही ठिकाणचे अतिक्रमण काढतांना काही अतिक्रमण धारकांची पाठराखण करण्यासाठी किंवा फक्त समाधान करण्यासाठी काही मान्यवरांचे फोन आले होते अशीही माहिती समोर येत आहे. मात्र फोन आल्यावर फक्त समोरच्या प्रतिष्ठीताचे समाधानासाठी फोन स्विकारले मात्र या अतिक्रमण काढतांना नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी आपली भूमिका कायम ठेऊन आपली मोहीम सुरुच ठेवल्याने या सडेतोड कारवाई बदल जनमानसातून कौतुकास्पद चर्चा ऐकावयास मिळत होती.

या अतिक्रमण हटाव मोहिमेत बाहेरपूरा भागातील मच्छीबाजार परिसरा पासुन प्रचंड फौजफाटयासह जे.सी.बी. द्वारे अतिक्रमणे काढण्यास सुरवात झालेली असली तरी टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्वच भागातील अतिक्रमणे हटवणार असल्याचे मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर यांनी प्रसारमाध्यमांंशी बोलतांना सांगितले. तसेच विशेष बाब म्हणजे अनेकांनी लिलावात गाळे घेतले आहेत. परंतु काहींची अद्यापही पूर्ण डिपॉडीट जमा नाही. अनेकांची भाडे व घरपट्टी थकीत असल्याने या वसुलीसाठी कठोर पावले उचलून उर्वरीत डिपॉझिट व थकीत भाडे वसुली करण्यासाठी एकमात्र कडवट व प्रभावी अभियान राबविण्यात येणार असल्याचे समजते.

तसेच विशेषबाब म्हणजे भाजी मार्केटच्या ओट्यांचे लिलाव झालेले आहेत. मात्र ज्यांनी हे ओटे लिलावात घेतलेले आहेत त्यापैकी काही महाभाग एका बाजूला लिलावात घेतल्या ओट्यावर आपल्या व्यवसायाची आपली दुकाने लावणे क्रमप्राप्त असतांनाही या ओट्यावर दुकाने न लावता दुसरीकडे अतिक्रमण करून आपला व्यवसाय करतात व दुसरीकडे हे ओटे भाड्याने देऊन भाड्यापोटी दररोज हजार ते पंधराशे रुपये भाडे कमावत आहेत. तर दुसरीकडे हातगाडी वाल्यांना स्वतंत्र हॉकर्स झोन दिलेला असतांनाही हे हातगाडीवर व्यवसाय करणारे हॉकर्स झोन सोडून मनाला पटेल तेथे भररस्त्यावर, मुख्य वर्दळीच्या ठिकाणी मनाला पटेल तेथे हातगाड्या उभ्या करुन रहदारीला अडथळा निर्माण करतात. हा गैरप्रकार नगरपालिकेच्या लक्षात आला असून पोलिस प्रशासनाला सोबत घेऊन यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी शोभाताई बावीस्कर यांनी सांगीतले.

तसेच बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुल परिसरातील भाजीपाला, फळ विक्रेत्यांना आपली अतिक्रमणे काढून घेण्यासंदर्भात पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी स्वतंत्र बैठक घेऊन सूचित केले. या सुचनेनुसार या परिसरातील विक्रेत्यांनी सहकार्याची भूमिका घेत आपापली अतिक्रमणे काढून घेतल्याने पालिका जीनचा परिसर काही प्रमाणात मोकळा झालेला आहे.

बाहेरपूरा भागातील मच्छी बाजारापासून कच्ची व पक्की अतिक्रमणे काढण्याला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली. यासाठी दोन जेसीबी, चार ट्रॅक्टर, पालिकेचे सुमारे ५० कर्मचारी , पोलीस मुख्यालय जळगाव, पाचोरा, पहूर व पिंपळगाव हरेश्वर येथील पोलिसांचा फौजफाटा तैनात करून अतिक्रमणे काढण्यात आली. काहींनी नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून आपली अतिक्रमणे काढून घेतली तर आठवडे बाजारातील काही अतिक्रमण धारकांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.

त्यानंतर उर्वरित अतिक्रमणा संदर्भात पालिका प्रशासन निर्णय घेणार असून मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, कर अधिक्षक मराठे यांनी स्वतः उपस्थिती देऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. तसेच यापुढेही टप्प्याटप्प्याने शहराच्या सर्व भागातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहे. दरम्यान या अतिक्रमण हटाव मोहिमेचे नागरिकांकडून कौतुक होत असून काढलेले अतिक्रमण पुन्हा जैसे थे होऊ नये यासाठी पालिकेने सजग राहावे अशीही मागणी व अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कारण अतिक्रमण काढतांना शासनाला मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो व या होणाऱ्या खर्चाचा विनाकारण नगरपालिकेच्या तिजोरीवर भार पडतो असे सूज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.

(या अतिक्रमण मोहिमेमुळे पाचोरा वासियांना मागील काळात अशीच धडक मोहीम राबवणाऱ्या स्व. दुर्गेशनंदिनी यांची आठवण झाली. कारण स्व.दुर्गेशनंदिनी यांनी रणरागिणीचे रुप धारण करत कोणत्याही मंत्री, खासदार, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक किंवा राजकीय पक्षाच्या हस्तक्षेपाला बळी न पडता कायमस्वरूपी अतिक्रमण काढले होते.)

सत्यजित न्यूज आधीची बातमी तसेच ध्येय न्यूज कडून अतिक्रमण काढण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे.

पदपथ (फुटपाथ) दाखवा बक्षीस मिळवा, पदपथावर अतिक्रमण रहदारीला अडथळा.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

कुऱ्हाड खुर्द येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी.

Next Article

टेम्पो ट्रव्हलरची दुचाकीला जोरदार धडक वरखेडी (भोकरी) ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा आगारप्रमुखांची मनमानी एस. टी. च्या प्रवाशांच्या डोळ्यात पाणी. भाग १.

    May 18, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    प्रशासक व ग्रामसेवकांना वाटत नाही लाज आणी लज्जा, ग्रामसभेत घेतलेल्या ठरावांचा उडवला फज्जा. अंबे वडगाव येथील संतप्त झालेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया.

    October 8, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    मै कार्यकर्ता हूं म्हणत लाकुड व्यापाऱ्यांकडून कुऱ्हाड, लोहारा, कळमसरा परिसरात हिरव्यागार वृक्षांची कत्तल.

    May 14, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    काकनबर्डी येथील खंडोबा महाराज मंदिरासाठी पर्यटन विकास मंडळाकडून पाच कोटींचा निधी उपलब्ध, आ. किशोर पाटील.

    April 4, 2023
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    कळमसरा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गटारीचे पाणी रस्त्यावर, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास.

    January 26, 2024
    By Satyajeet News
  • पाचोरा तालुका.

    पाचोरा येथे उद्या रोटरी क्लब तर्फे रस्ते सुरक्षा विषयक व्याख्यान व जनजागृती उपक्रम.

    January 19, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • क्राईम जगत

    गौण खनिज वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या कारवाईत वाळू माफियांचा खोडा घालण्याचा प्रयत्न असफल.

  • आपलं जळगाव

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • ब्रेकिंग न्यूज

    सावखेडा येथील श्री. भैरवनाथ बाबा मंदिर परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज