पाचोरा येथे रेशनिंगच्या धान्यासाठी काँग्रेसचे निवेदन; तहसीलदांनी घेतली दखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०२/२०२२
पाचोरा तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागात गेल्या दोन महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे याची गंभीर दखल घेत तातडीने रेशनचे धान्य वितरण करण्याच्या मागणीचे निवेदन पाचोरा काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार मा.श्री. कैलास चावडे साहेब यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांनी निवेदनाची दखल घेत तात्काळ धान्य पुरवठा करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत.
याप्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण, माजी अध्यक्ष साहेबराव पाटील, शेख इस्माईल शेख फकिरा, महीला शहर अध्यक्षा अॅड. मनिषा पवार, ओबीसी सेल अध्यक्ष शेख इरफान शेख इक्बाल मनियार, राहुल शिंदे, अमजद खान मजीद खान, शरीफ शेख, शंकर सोनवणे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच पाचोरा शहरासह तालुक्यातील बरेचसे रेशनिंग दुकानदार धान्य वाटप करतांना कार्डधारकांचा थाम्स घेऊन रेशनिंगचे धान्य वाटप करतात परंतु त्यांना कोणतीही पावती देत नसल्याने त्यांच्या नावे किती धान्य आले होते पैकी किती मिळाले याची माहिती मिळत नाही. पावती मागीतल्यास रोल शिल्लक नाही, रोल मिळत नाही कागदाचा तुटवडा आहे अशी कारणे सांगितली जातात अशीही तक्रार रेशनकार्ड धारक करत आहेत.